आटपाडीलगतच्या गावांचा साताऱ्यात पाण्यासाठी मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

सातारा - माण तालुक्‍यातील उरमोडी व तारळी धरणांच्या पाण्यापासून वंचित राहणाऱ्या आटपाडी हद्दीजवळच्या 16 गावांतील ग्रामस्थांनी आज येथे आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. 

ग्रामस्थांच्या या मोर्चास पोवई नाका येथून प्रारंभ झाला. तेथून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, बॉम्बे रेस्टॉरंट चौकमार्गे कृष्णानगर येथील पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तेथे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी उरमोडी व तारळी धरणांच्या पाण्यापासून वंचित राहणाऱ्या आटपाडी हद्दीजवळच्या 16 गावांमधील ग्रामस्थांच्या मागण्यांसदर्भातले निवेदन अधीक्षक अभियंत्यांना सादर केले. त्यावेळी अनिल देसाई, डॉ. प्रशांत पन्हाळकर, दत्तात्रय सोनवणे, सुरेश कदम, विजय जगताप, बाळासाहेब जगताप, बी. डी. जाधव यांच्यासह 16 गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: rally for water in satara