रमाई आवास घरकुल योजनेत बांधकाम परवानेच नाहीत!

राजकुमार शहा 
सोमवार, 4 जून 2018

मोहोळ शहरासाठी रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत जिल्हयात सर्वाधिक घरकुले मंजुर झाली आहेत. मात्र किरकोळ कारणावरून घरकुलांची कामे रखडली आहेत.

मोहोळ - मंजुर घरकुलाचे बांधकाम परवाने व धनादेश वाटप होत नसल्याच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्ष यशोदा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली येथील नगर परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

मोहोळ शहरासाठी रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत जिल्हयात सर्वाधिक घरकुले मंजुर झाली आहेत. मात्र किरकोळ कारणावरून घरकुलांची कामे रखडली आहेत. नगर परिषद प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून ही घरकुलांचे बांधकाम परवाने व धनादेश वाटप होत नसल्याच्या निषेधार्थ महिला आघाडीच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे अंदोलन सुरू असुन मागण्या मंजुर न झाल्यास चुलीवर स्वयंपाक करणे, असुड हालगी नाद व कपडे धुणे अशा विविध प्रकारची आंदोलने करण्यात येणार आहेत. आंदोलनात कल्पना खंदारे नंदा बनसोडे वर्षा दुपारगुडे सिंधुताई वाघमारे जयश्री खंदारे लता देवकुळे हिराबाई गायकवाड लोचना रणदिवे केशर खवळे शांतीकुमार अष्टुळ संजीव खिलारे बिलाल शेख आदी जण सहभागी झाले आहेत.
   
कैलास गावडे (मुख्याधिकारी मोहोळ नगर परिषद)
ज्यांची स्वतःची जागा आहे सातबारा त्यांच्या नावचा आहे. त्यांचे प्रस्ताव मंजुर आहेत. मात्र जे शासनाच्या जागेवर. राहतात त्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविले आहेत. मंजुरी येताच सर्व काम मार्गी लागेल आजच्या घडीला एकही प्रस्ताव माझ्याकडे प्रलंबित नाही.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Ramai Aavas Gharkul Yojna