राज्यात सातारा ‘रमाई’त ‘टॉप’

विशाल पाटील
गुरुवार, 26 एप्रिल 2018

राज्याला 95 हजार घरकुलांचे उद्दिष्ट; 2019 पर्यंत योजना पूर्णत्वाला नेणार
सातारा - ग्रामीण गृहनिर्माण योजनेंतर्गत रमाई आवास योजनेत २०१७-१८ मध्ये राज्यात तब्बल ९५ हजार घरकुले बांधणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ६७ हजार घरकुलांना मंजुरीही मिळाली आहे. राज्यात सातारा, नगर, पुणे, रत्नागिरी, सांगली, सोलापूर जिल्ह्याने शंभर टक्‍के घरकुलांना मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यास वाढीव उद्दिष्ट जानेवारीमध्ये दिले असतानाही त्या प्रस्तावांना मंजुरी देऊन आठ घरकुलेही पूर्णत्वाला गेली आहेत. २०१९ पर्यंत या योजनेतील शंभर टक्‍के लाभार्थ्यांना घरे दिली जाणार आहेत.

‘सर्वांसाठी घर’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात स्वत: लक्ष घातले आहे. नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजनेची माहिती घेतली. २०१९ पर्यंत रमाई योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांना शंभर टक्‍के घरकुले देण्याच्या दृष्टीने त्यांनी सूचना दिल्या आहेत. 

२०१७-१८ मध्ये राज्यात ९५ हजार ८२३ घरकुलांचे उद्दिष्ट असून, त्यातील ६७ हजार २९६ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. मात्र, त्यापैकी अवघी १३ घरकुले आजवर बांधली आहेत. त्याचे उर्वरित काम तत्काळ सुरू करून ती पूर्ण करण्याच्या तसेच २०१९ पर्यंत ‘रमाई’तील शंभर टक्‍के लाभार्थ्यांना घरे देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत उद्दिष्ट निश्‍चित करून सादर करण्याच्या सूचना समाजकल्याण आयुक्‍त मिलिंद शंभरकर यांनी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यास जानेवारीअखेरीस तीन हजारांचे उद्दिष्ट दिले असतानाही अवघ्या तीन महिन्यांत दोन हजार ९९१ घरकुलांना मंजुरी देत राज्यात बाजी मारली आहे.

तसेच २०१६-१७ मध्ये एक हजार ९५२ पैकी एक हजार ५०७ घरकुले पूर्ण करून राज्यात सातारा ‘टॉप’ ठरला आहे.

रमाई योजनेतून सातारा जिल्ह्यातील सर्वच लाभार्थ्यांना घरकुले मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. चालू वर्षातील घरे पूर्ण करू. २०१९ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी गटविकास अधिकारी, ग्रामसेवकांशी संपर्क साधावा.
- डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा

‘रमाई’ घरकुल स्थिती (2016-17)
50,017 लक्ष्य
49,938 मंजुरी
22,773 पूर्ण
27,165 अपूर्ण

Web Title: ramai gharkul scheme home construction