मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या महापुजेला विरोध करणारा 2 महिन्यानंतरही तरुंगात

बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

पंढरपूर- मराठा आरक्षणासाठी 'मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात आषाढी एकादशीला पूजा करु देणार नाही' असा इशारा देणारे महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण कृती समितीचे संस्थापक रामभाऊ गायकवाड गेल्या दोन महिन्यांपासून तुरुंगातच आहेत. यासंबंधीत गायकवाड यांच्या तुरुंगातील फोटोसह फेसबूक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

आषाढी वारीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी पंढपुरात पूजा विठ्ठलाची पूजा करण्याची पद्धत आहे. परंतु मराठा मोर्चाच्या आयोजकांनी यावर्षी मुख्यमंत्र्यांना पंढपुरात पूजा करू देणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर रामभाऊ गायकवाड यांना अटक करण्यात आली होती. दोन महिन्यापासून ते तुरुंगातच आहेत. 

मराठा समाजाबद्दल भाजप सरकारला एवढा आकस का?
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील याविषयी भाजप सरकारवर टिका केली आहे. 'एकीकडे मनोहर भिडे या इसमाविरोधातील दंगलीचे गुन्हे मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले, दुसरीकडे पंढरपूरचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक श्री. रामभाऊ गायकवाड यांना २ महिने झाले जेलमध्ये सडवत ठेवले आहे. मराठा समाजाबद्दल भाजप सरकारला एवढा आकस का? असे ट्विट त्यांनी केले आहे.

Web Title: rambhau gaikwad who opposed cm devendra fadanvis at pandharpur is in jail