तुमची जमली जोडी, माझ्याकडे कुठे आहे गाडी - आठवले

तुमची जमली जोडी, माझ्याकडे कुठे आहे गाडी - आठवले

कोल्हापूर - तुमची चांगली जमली जोडी. माझ्याकडे कुठे आहे लोकसभेची गाडी, बंद पडलेल्या घड्याळाकडे आणि काँग्रेसकडे जाऊन उपाशी मरायचे आहे का? अशा शब्दात कोटी करत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज उपस्थितांची मने जिंकली. येत्या मंत्रीमंडळात हा पट्टा असणार, नाव आहे कोल्हापूर आणि येथे युतीचा महापूर असे सांगत आठवले यांनी उपस्थितांना साद घातली.

कविमनाच्या आठवले यांच्या भाषणाविषयी प्रत्येकाला उत्सुकता असते. महायुतीच्या सभेत ते काय बोलतात याकडे लक्ष लागून राहिले होते. नेहमीप्रमाणे आपल्या स्टाईलमध्ये एंट्री घेत त्यांनी माईकचा ताबा घेतला आणि उपस्थितांत हास्याचे लकेर उमटले. 

भाषणाची सुरवात त्यांनी कवितेने केली. कमळ आणि धनुष्यबाण, वाढविणार आहोत आम्ही भारताची शान, सर्वांचे लागले मोदीकडे ध्यान, नाव आहे कोल्हापूर आणि दिसतो येथे युतीचा महापूर, जनतेचा पूर पाहून भरून आले माझे मन, तुमच्या दोघांची जमली जोडी आणि माझ्याकडे नाही लोकसभेची गाडी.

आठवले म्हणाले, मी ही काँग्रेससोबत होतो. म्हंटले की रस्ते करा पण नाही झाले. त्यामुळे सत्तेतून तेच गेले,. देशाच्या हितासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाछविण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान होणे गरजेचे आहे. तुम्ही दोघांनी वाद मिटविले पण तुमच्यासोबत आले आठवले. मोदी सरकार हे दलितांच्या विरोधात नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com