वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा रविवारी गौरव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

माजी आमदार, ज्येष्ट साहित्यिक, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (ता. 26) सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व उज्ज्वला शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होईल, अशी माहिती सचिव बिपीनभाई पटेल यांनी दिली.

सोलापूर- माजी आमदार, ज्येष्ट साहित्यिक, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (ता. 26) सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व उज्ज्वला शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होईल, अशी माहिती सचिव बिपीनभाई पटेल यांनी दिली.

डॉ. निर्मलकुमाऱ फडकुले सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होईल. डॉ. किशोर सानप यांनी लिहलेल्या रामदास फुटाणे यांच्या भाष्य कविता या ग्रंथाचे प्रकाशनही होणार आहे. ज्येष्ठ समीक्षक डॅा. गो. मा. पवार, ज्येष्ठ कवी फ. मु. शिंदे उपस्थित राहणार आहेत.

तसेच, अमृत सोहळ्यानिमित्त रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

Web Title: Ramdas Futane pride on Sunday