रमेश बारसकर म्हणजे ना जातीभेद ना पक्षभेद असे व्यक्तीमत्व

रमेश बारसकर म्हणजे ना जातीभेद ना पक्षभेद असे व्यक्तीमत्व

मोहोळ - रमेश बारसकर म्हणजे जिल्ह्यातील चर्चेचा विषय कधी माणुसकी तर कधी दुसऱ्याला मदत करण्याची भावना, ना जातीभेद ना पक्षभेद असे व्यक्तीमत्व. विवाह समारंभातील हुंड्याची रक्कम न दिल्याने मोहोळ येथील गायकवाड वस्तीवरील मृत सखुबाई समाधान गायकवाड या गरोदर महीलेचा तिसरीचा धार्मिक विधी नगराध्यक्ष बारसकर यांनी करून आणखी समाजात माणुसकी शिल्लक असल्याचे दाखवुन दिले, तर त्यांना पोलीसांनीही सहकार्य करून खाकी वर्दीतील माणूसकीचे दर्शन घडविले . या सामाजिक बांधीलकीची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

मोहोळ शहरानजिक गायकवाड वस्ती आहे, या वस्तीवर राहणाऱ्या सखुबाई समाधान गायकवाड या गरोदर महिलेला विवाह समारंभात ठरलेली पंचवीस हजाराची रक्कम, माहेरच्या मंडळीनी दिली नाही म्हणून सखुबाईच्या अंगावर पेट्रोल टाकुन पती, सासु ,सासरे, नणंद यांनी तिला पेटवुन दिले, उपचारादरम्यान तिचा रूग्णालयात मृत्यु झाला. या घटनेची नोंद मोहोळ पोलीसात झाली, नोंद होताच. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवुन कांही आरोपीना अटक केली उर्वरीत आरोपींच्या शोधात पोलिस आहेत.

आरोपींना अटक केल्याने वस्तीवर मुक्या जनावराशिवाय कोणीही नव्हते. चार दिवसांपासुन त्यांना ना अन्न ना पाणी. चार दिवसाचा कालावधी उलटुन गेला होता. काही जरी असले तरी हिन्दु धर्म रूढीप्रमाणे सखुबाईचा तिसरीचा धार्मिक विधी होणे गरजेचे होते. अंगणातच अग्नीसंस्कार केल्याने भिती पोटी त्या ठिकाणी कोणीही जाण्यास तयार नव्हते. ही घटना नगराध्यक्ष बारसकर यांना समजताच त्यांनी पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे या घटनेचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अन्वर मुजावर यांच्याशी चर्चा केली व तिसरीचा विधी करण्याची इच्छा व्यक्त केली.

बारसकरांच्या या इच्छेने पोलिसांच्या खाकी वर्दीतील माणुस जागा झाला, व त्यांनी   सखुबाईच्या अस्थी सिना नदीत विसर्जन करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे बारसकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यासह अस्थी विसर्जन केले. तर मुक्या जनावरांच्या चारा पाण्याची जबाबदारी मृत सखुबाईचे चुलते रावसाहेब यांच्याकडे सोपविली. खाकी वर्दीतील पोलीस व खादी तील समाजसेवक, यांनी सखुबाईचा तिसरी चा विधी करून समाजात आजही माणुसकी शिल्लक आहे याचे दर्शन घडविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com