कऱ्हाडात रामोशी आरक्षणासाठी मोर्चा

हेमंत पवार 
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

रामोशी बेरड समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, रामोशी समाजाच्या जमीनी परत कराव्या, आद्यक्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या नावे टपाल तिकीट काढण्यात यावे, रामोशी समाजातील मुला-मुलींसाठी आश्रमशाळा व जिल्ह्याच्या ठिकाणी वसतीगृह सुरु करावे, रामोशी समाजासाठी उमाजी नाईक समाज विकास महामंडळ स्थापन करावे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार राजेंद्र शेळके यांना देण्यात आले

कऱ्हाड - यळकोट यळकोट जय मल्हारच्या... जयघोषात आज रामोशी बेरड समाजाच्यावतीने कऱ्हाडमध्ये मोर्चा काढण्यात आला. जुन्या कोयना पुलाजवळील दैत्यनिवारणी मंदिरासमोरुन सुरु झालेला मोर्चा शाहु चौक मार्गे, दत्त चौकातून तहसीलदार कार्यालयासमोर नेण्यात आला. तेथे रामोशी बेरड समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, रामोशी समाजाच्या जमीनी परत कराव्या, आद्यक्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या नावे टपाल तिकीट काढण्यात यावे, रामोशी समाजातील मुला-मुलींसाठी आश्रमशाळा व जिल्ह्याच्या ठिकाणी वसतीगृह सुरु करावे, रामोशी समाजासाठी उमाजी नाईक समाज विकास महामंडळ स्थापन करावे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार राजेंद्र शेळके यांना देण्यात आले. दरम्यान मागण्यांसाठी १६ आॅगस्टला कोल्हापुरमध्ये रास्तारोको करण्याचाही इशारा जयमल्हार क्रांती संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Ramoshi reservation Morcha in Karhad