साताऱ्यात रामराजेंच्या प्रतिमेचे दहन (व्हिडिओ)

Satara
Satara

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर जहरी शब्दांत टीका केल्याच्या निषेधार्थ साताऱ्यातील राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आज पोवई नाक्‍यावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेचे दहन केले.

खासदार उदयनराजे हे आमचे दैवत आहेत. त्यांच्यावर कोणी अशा प्रकारे खालच्या स्तरावर जाऊन टीका करत असेल, तर ते आम्ही सहन करणार नाही, असा इशारा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष नितीन शिंदे  आणि संतोष घाडगे यांनी या वेळी दिला. अशा प्रकारची बेताल वक्तव्ये यापुढे कोणी केली, तर साताराच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल. महाराजांवर प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरतील, असेही शिंदे यांनी म्हटले आहे. 

काल फलटण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामराजे यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर टीका करताना त्यांचा चक्रम असा उल्लेख केला होता. त्याचा निषेध म्हणून आज प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला. 

खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे यांच्यात जुना राजकीय संघर्ष आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका रामराजे आणि काही आमदारांनी घेतली होती. मात्र, पक्षाध्यक्ष पवार यांनी सगळ्यांची समजूत काढत उदयनराजे यांनाच उमेदवारी दिली होती. नीरा-देवधरच्या पाण्याच्या मुद्‌द्‌यावरून आता पुन्हा या दोघांमध्ये संघर्ष सुरू झाल्याचे दिसत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com