Diwali Festival : रांगोळी व्यवसायाला पुराचा फटका (व्हिडिओ)

Rangoli business affected by Kolhapur Flood
Rangoli business affected by Kolhapur Flood

कोल्हापूर : दिवाळीची बाजारपेठ रंगीबेरंगी रांगोळीने सजली आहे. मात्र, ‌‌पुरस्थितीमुळे यावर्षी बाजारातून दोन रंगाची रांगोळी गायब झाली आहे. पुरामुळे काही कारखाने सुरू न झाल्यामुळे रांगोळीचा बाजार या वेळेस दोन रंगांना मुकणार आहे.

दिवाळीच्या अनेक खरेदीबरोबर रांगोळीची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते. झोपडपट्टीपासून ते उच्चवर्णीयांच्या अंगणाची शोभा रांगोळी वाढवत असते. बहुतांश युवती आणि महिला आज रांगोळी काढण्याचे विशेष प्रशिक्षणासाठी जातात. या ठिकाणी त्यांना अनेक नमुन्याचे रांगोळी काढण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे आपल्या हाताची रांगोळी शुभदिनी असावी असाच महिलांचा मोठ्या प्रमाणात कल असतो. यासाठी त्या रंगबिरंगी रंगाची रांगोळी खरेदी करत किमान पाच ते सहापेक्षा अधिक रंग महिला खरेदी करत असतात.

ही रांगोळी सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. शहरातील मुख्य बाजारात अनेक ठिकाणी रांगोळीचे मोठे स्टॉल लागले आहेत. एका बुट्टीत डोंगर आकाराने रचून ठेवलेली ही रांगोळी बाजारा ठळकपणे आकर्षित करत आहे. रांगोळीचे दर सात रुपयापासून वीसपर्यंत आहेत. अनेक विक्रेत्यांनी सर्वसामान्यांना रांगोळी खरेदी करता येईल यासाठी पाच रुपयांची पाकीटेसुद्धा तयार करून ठेवली आहेत.



दरवर्षी सतरा कलरची रांगोळी या वर्षी मात्र 15 कलरमध्ये उपलब्ध झाली आहे. यावर्षी,  बेबी पिंक आणि डार्क पोपटी हे दोन रंग गायब झाले आहेत. पूरस्थितीचा फटका या रंगालाही ही बसल्यामुळे हे कलर बाजारात आले नाहीत. संस्कार भारती रांगोळीसाठी डार्क कलर महत्वाचे असतात. दिवाळीच्या दरम्यान रांगोळीमध्ये अनेक डार्क कलर पहायला मिळतात. ही रांगोळी खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातून अनेक महिला शहरी भागात येत असतात. पांढरी, केसरी पिवळी गुलाबी हिरवी लाल जांभळी हिरवी काळी अशा गडद रंगाच्या रांगोळी पासून ते विविध कलरच्या अनेक रांगोळ्या किलोच्या किलो खरेदी करण्याकडे महिलांचा कल असतो. शहरात गेले चार दिवस सतत पाऊस सुरू आहे, तरीही कोल्हापूरमध्ये महिला उत्स्फूर्तपणे रांगोळी खरेदी करत आहेत.

महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे यावर्षी पंधराच रांगोळी बाजारात आल्याआहेत , रांगोळी व्यवसायदेखील त्याचा परिणाम झालेला आहे. यावर्षी दोन कलर ची रांगोळी बाजारात आली नाही. - वासिम तांबोळी, रांगोळी विक्रेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com