निपाणीत रंगपंचमीसाठी बाजारपेठेत रंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rangpanchami

कोरोनानंतर दोन वर्षांनी यंदा होळी, धूलिवंदन, रंगपंचमी सण निर्बंधमुक्त होणार आहेत.

Rangpanchami : निपाणीत रंगपंचमीसाठी बाजारपेठेत रंग

आज होळी पारंपरिक पद्धतीने साजरी झाली. उद्या (ता. ७) धूलिवंदन, रविवारी (ता. १२) रंगपंचमी असल्याने बाजारपेठेत बालगोपाळांसह नागरिकांची रंग, पिचकारी खरेदी करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्याने सर्व प्रकारच्या रंगाच्या दरात वाढ झाली आहे. बाजारपेठेत विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, दोन प्रकारचे स्प्रे, लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या पिचकाऱ्या दाखल झाल्या आहेत.

मिनी थंडर व थंडर अशा दोन प्रकारच्या स्प्रेला ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. विविध आकाराच्या पिचकाऱ्यांना लहान मुलांची पसंती मिळत आहे. साधारण १०० पासून ४०० रुपयांपर्यंत बाजारात पिचकाऱ्या उपलब्ध आहेत. रंगाचे पोते १०० ते २५० रुपयांपर्यंत मिळत आहे. टॉपगन, वॉटर टँक व पिचकारी ५० ते ५०० रुपये अशा किंमतीत उपलब्ध आहेत.

कोरोनानंतर होळी, धूलिवंदन व रंगपंचमीचा सण निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होणार आहे. त्यामुळे बाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या, रंग उपलब्ध झाले. त्यामुळे आतापासूनच ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.’’

- बगाराम सोळंकी, रंग व पिचकारी विक्रेते, निपाणी