डिसले ठरले संयुक्त राष्ट्रांच्या शिक्षण मोहिमेचे सदिच्छादूत

disle
disle

करकंब : परितेवाडी (ता. माढा) येथील सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांची संयुक्त राष्ट्रांच्या शिक्षण मोहिमेचे सदिच्छादूत (Teach SDGs  Ambassador) म्हणून  निवड झाली आहे. सन 2015 साली न्यूयॉर्क येथे झालेल्या आमसभेत 167 राष्ट्रांनी शाश्वत विकासाची उद्दिष्टे निश्चित केली असून ही उद्दिष्टे सन 2030 पर्यंत साध्य करण्यासाठी भारताने कटीबद्धता व्यक्त केली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्यावतीने शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनेकविध उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांना याकरिता पुरस्कृत करण्यात आले आहे. भारत, पाकिस्तान सह जगातील आठ अशांत देशांतील मुलांची 'पीस आर्मी' तयार करून सन 2030 पर्यंत पन्नास हजार शांतताप्रिय नागरिक घडवणाऱ्या  'लेट्स क्रॉस द बॉर्डर्स' या शैक्षणिक प्रोजेक्टची दखल घेत त्यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे.  सोळाव्या क्रमांकाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा प्रोजेक्ट राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात पाच हजार विद्यार्थ्यांची 'पीस आर्मी' तयार झाली आहे. सन 2030 पर्यंत हा प्रोजेक्ट सुरू राहणार आहे. असा बहुमान मिळवणारे ते जिल्हा परिषदेच्या शाळेतील एकमेव शिक्षक ठरले आहेत. भारतातील एकूण आठ शिक्षकांना हा बहुमान प्राप्त झाला आहे. डिसले गुरुजींचा हा प्रोजेक्ट आता आंतराष्ट्रीय पातळीवर राबवण्यासाठी  संयुक्त राष्ट्र संघाने पुढाकार घेतला असून अशांत देशांतील शिक्षक व विद्यार्थी यांच्यापर्यंत हा उपक्रम नेण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे.

हा बहुमान खऱ्या अर्थाने 'पीस आर्मीचे' सदस्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना समर्पित करतो. झेडपीचे प्रशासन, अधिकारी व शाळा प्रमुख यांच्या सहकार्याने हा प्रोजेक्ट व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यासह राज्यातील शाळांनी यात सहभागी होऊन शांतताप्रिय नागरीक घडवण्यात सहकार्य द्यावे.
- रणजीत डिसले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com