रणजित कोळेकर लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मिळवले यश

हुकूम मुलाणी
रविवार, 24 जून 2018

मंगळवेढा : पाण्यासाठी टाहो फोडणाय्रा गावात शेतीत करिअर करण्यापेक्षा चांगला अधिकारी व्हायचे स्वप्न बाळगून पुण्यात गेलेल्या तालुक्यातील पाठखळ येथील रणजित कोळेकर हा तरुण लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवून अखेर पोलीस उपनिरीक्षक झाला. थोरल्या भावाने तोकडया पगारात मंगळवेढयातील मेडीकल दुकानात काम करत केलेल्या आणि घेतलेल्या कष्टाचे चीज झाले.

वडील पोलीस दलात असल्यामुळे पोलीस खात्यातील कामाबददल रणजित कल्पना होती.पण मुलांनी कोणते क्षेत्र निवडावे यासाठी मात्र आग्रह धरला नाही. पाठखळच्या प्राथमिक शिक्षण शिकुन माध्यमिक शिक्षण इंग्रजी स्कुल तर, महाविदयालयीन मदनसिंह मोहिते पाटील शास्त्र महाविदयालय मंगळवेढा येथे घेतले. 2016 साली पालघर येथे पोलीस दलात निवड झाली तरीही अधिकारी बनण्याचे स्वप्न उरी बाळगल्यामुळे त्या पदावर हजर न होता म्हणून त्यांने लोकसेवा लोकसेवा परिक्षेतून प्रशासनातील अधिकारी बनावयाचे स्वप्न मनात ठेवत आयोगाची तयारी करण्यासाठी थेट 2015 ला पुणे गाठले.

लोकसेवा आयोगाची दोन वर्षे तयारी पुण्यात केल्यानंतर डिसेबर 2016 आलेल्या जाहीरातीनुसार अर्ज दिला त्यानंतर फेब्रुवारी 2017 ला प्रवेश झाली, मुख्य परिक्षा जुन 2017 झाली शारीरीक चाचणी नोव्हेबर 2017 झाली या निकालात न्यायालयीन प्रक्रियेत विलंब होवून 20 जुनला निकाल जाहीर होताच आनंद गगनात मावेना इंग्रजी व गणित या विषयासाठी क्लास लावला अन्य विषयाचा अभ्यास करुन हे यश मिळविले. रणजितला नायब तहसीलदार महादेव कारंडे, बुध्ददेव भालशंकर यांनी मोलाची मदत केल्यामुळे या यशापर्यत जाता आले आता जनता आणि प्रशासनातील दुवा म्हणून काम करुन नावलौकीक करण्याची संधी प्राप्त झाल्याने त्यासाठी प्रयत्न करणार असल्याने रणजितने सकाळला सांगितले.

Web Title: ranjit kolekar get success public service commission examination