रंकाळा तलाव परिसरात स्वच्छता मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या हेल्पिंग हॅंड फौंडेशनच्यावतीने रंकाळा तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तासगावस्थित या संस्थेच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने "स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर'ची हाक देण्यात आली. 

अंबाई टॅंकच्या पिछाडीस असलेल्या तलावाच्या भागात स्वच्छता झाली. सुमारे दोन तासांच्या मोहिमेत परिसर चकाचक झाला. प्लास्टिक पिशव्यांसह अन्य कचरा उचलण्यात आला. सकाळी नऊच्या सुमारास स्वच्छतेस प्रारंभ झाला. 

रंकाळा तलाव कोल्हापूरचे वैभव आहे. येथे दररोज लोकांची वर्दळ असते. महापालिकेच्या उद्यान विभागाकडील कर्मचारी कार्यरत आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून असतात; मात्र रंकाळा चौपाटी, रंकाळा उद्यान, पदपथ उद्यान, क्रशर खाण परिसर, राज कपूर पुतळ्यासमोरील उद्यानाचा परिसर, तांबट कमान, संध्यामठ ते चौपाटी अशा सुमारे अडीचशे एकर परिसरात रंकाळा विस्तारला आहे. पाण्याचा भाग सोडला तर अन्य भागात स्वच्छतेचा प्रश्‍न उभा राहतो. खाद्यपदार्थांच्या गाड्या, मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांमुळे होणारा कचरा, असे प्रश्‍न तयार होतात. हेल्पिंग हॅंडसारख्या अन्य संस्था पुढे सरसावल्या की स्वच्छतेचा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांतून व्यक्त झाली. गोळा केलेला कचरा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित केला. 

संस्थेचे अध्यक्ष विशाल शिंदे, गीता हासूरकर, प्रशांत पाटील, अभिजित पाटील, रितेश बियाणी, आशीष बोथटा, चेतन आंबेकर, सोनाली हवालदार, शीतल पाटील, गोपी चव्हाण, शंकर पाटोळे, सौरभ गायकवाड, मुकादम संजय मांजरे आदी मोहिमेत सहभागी झाले.

Web Title: Rankala Sanitation Campaign