Video : खड्ड्यांवर कोल्हापूरकरांचे रॅप साँग 

सुयोग घाटगे
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

कोल्हापुरात सध्या सर्वच रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य आहे. या खड्यातून रोज प्रवास करताना नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विविध स्थरातून या खड्डे युक्त रस्त्यांचा समाचार घेण्यात येत आहे.

कोल्हापूर - 
रस्त्यात खड्डे खड्ड्यात जनता 
गाडी चालवून बाद झाला मनका 
नेत्यांचा धंदा त्रासात जनता 
धुळीमुळे बसतोय आरोग्याला फटका 

या आणि अशा आशयाच्या शब्दरचनांनी कोल्हापूरच्या खड्यांमुळे होणाऱ्या त्रासावर भाष्य करत तरुणाई रस्त्यावर आली आहे .

रॅप साँगमधून खड्ड्यांचा निषेध

कोल्हापुरात सध्या सर्वच रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य आहे. या खड्यातून रोज प्रवास करताना नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विविध स्थरातून या खड्डे युक्त रस्त्यांचा समाचार घेण्यात येत आहे. खड्यांचा प्रश्‍न मांडण्यासाठी युवक एकत्र आले असून त्यांनी रॅप सॉंगद्वारे या रस्त्यावरील खड्यांचा निषेध नोंदवला आहे.

सुमारे ३० हुन अधिक रॅपर एकत्र

सुमारे 30 हुन अधिक रॅप सिंगर यांनी या वेळी एकत्र सादरीकरण केले. विविध कार्यक्षेत्रात काम करत स्वतःच वेगळी अशी ओळख निर्माण करणारे हे रॅपर एकत्र येत शहरातील खड्यातून प्रवास करताना होणार त्रास आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या समस्या या बद्दल तालबद्द रचना सादर केली.

हक्काचे रस्ते नीट व्हावेत

समाजातील विविध घटक रस्ते प्रश्नी रस्त्यावर उतरत असताना तरुणांनी देखील आम्ही कमी नाही आहोत, असे दाखवून दिले आहे. लौकरात लौकर कोल्हापूरकरांना त्यांच्या हक्काचे रस्ते नीट करून द्यावेत. हा या कोल्हापूरच्या जनतेचा हक्क आहे. आणि आंम्ही तो मिळवणारच असा काहीसा रोख या तरुणाच्या आवाजातून समोर आला. तरुणानी देखील प्रशासनाला आम्ही जागे आहोत असे या माध्यमातून जाणिव करून दिली आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rap Song On Potholes In Kolhapur City