बलात्कारासह खूनप्रकरणाचा अवघ्या चोवीस तासात छडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

करण शंकर कोळी (वय 22, रा. पोकोली, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे संबधित महिलेचे  नाव आहे. सविता गणेश पाटील (वय 22, रा. येणपे) खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिस निरिक्षक अशोक क्षिरसागर व त्यांच्या पथकाने कसून चौकशी केली. त्यावेळी खूनाचा प्रकार उघडकीस आला. संशयित करण कोळी हा त्या महिलेच्या आजोळचा आहे. ताब्यात घेतलेला अल्पवयीन मुळचा येणपे येथील आहे.

कऱ्हाड- येणपे येथे विवस्त्र अवस्थेत संशयास्पदरित्या सापडलेल्या महिलेचा बलात्कार करून खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. येणपेच्या धरणाजवळील माळरानात हा प्रकार घडला आहे. त्याबाबत एकास अटक करण्यात आली आहे.

करण शंकर कोळी (वय 22, रा. पोकोली, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तर, सविता गणेश पाटील (वय 22, रा. येणपे) खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिस निरिक्षक अशोक क्षिरसागर व त्यांच्या पथकाने कसून चौकशी केली. त्यावेळी खूनाचा प्रकार उघडकीस आला. संशयित करण कोळी हा त्या महिलेच्या आजोळचा आहे. ताब्यात घेतलेला अल्पवयीन मुळचा येणपे येथील आहे.

घटनेनंतर अवघ्या 24 बलात्कारासह खूनाच्या तापासाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. काल रात्रभर सशंयिताकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी खूनाची कबुली दिली आहे. संबधित महिलेच्या तोंड व नाक दाबून खून केल्याचीही माहिती पुढे येत आहे.

Web Title: rape case news in karad