चिमुकलीवर अत्याचार; एकास मरेपर्यंत जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

नगर - रेल्वेस्थानक परिसरात तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस विशेष जिल्हा न्यायालयाने नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व 55 हजार रुपये दंड केला. बाळू गंगाधर बर्डे (वय 32, रा. सोनगाव, ता. राहुरी) असे त्याचे नाव आहे. केडगाव औद्योगिक वसाहतीजवळील काटवनात नऊ डिसेंबर 2016 रोजी एक मुलगी जखमी अवस्थेत नागरिकांना आढळून आली. याबाबत माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमी मुलीला जिल्हा रुग्णालयात हलविले. तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे तिला ससून रुग्णालयात (पुणे) हलविले. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. अथक प्रयत्नांनंतर तब्बल 22 दिवसांनी सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी आरोपी बर्डे यास अटक केली. त्याने पोलिसांना घटनास्थळ आणि स्वत:चे कपडे दाखविले. पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुरवातीला खटल्याचे कामकाज विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर चालले.
Web Title: rape on child crime accused Life imprisonment punishment