व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

सातारा - जबरदस्तीने केलेल्या शारीरिक संबंधांचा अश्‍लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार करत संबंधित मुलीची चार वेळा लग्न मोडणे, तसेच आता सासरच्या लोकांना हा व्हिडिओ पाठविण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अशोक तुलसीदास यादव व शिवाजी यादव (रा. खिंडवाडी, ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत.

संबंधित युवती एका ठिकाणी काम करत होती. तेव्हा तिची अशोकशी ओळख झाली. ऑफिस सुटल्यानंतर तो तिला जबरदस्तीने दुचाकीवरून घरी सोडत होता. एकदा ती घरी एकटीच असताना त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. त्याचे चित्रीकरण केले.

काही दिवसांनंतर तिने अशोकशी बोलणे बंद केले. त्यानंतर त्याने मोबाईलवरून शरीरसुखाची मागणी केली. त्यास नकार दिल्याने त्याने अश्‍लील व्हिडिओ तिच्या व्हॉट्‌सऍपवर पाठविला. तसेच तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने तिला जबरदस्तीने लॉजवर बोलावून अत्याचार केला.

दरम्यानच्या कालावधीत मुलीचे लग्न ठरले. त्याने त्या मुलांना व्हिडिओ पाठवून आमचे शारीरिक संबंध आहेत, असे सांगितले. त्यामुळे तिची चार वेळा लग्ने मोडली.

काही दिवसांनी तिचा विवाह झाला. त्यानंतरही त्याचा त्रास सुरूच राहिला. व्हिडिओ डिलिट करण्यासाठी त्याने तिच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडिओ पतीला दाखवण्याबरोबरच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून मुलीने अखेरीस काल शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर तपास करीत आहेत.

Web Title: rape crime video