अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागापूर आणि पिंपळगाव माळवी या ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या. पिंपळगाव माळवी येथील पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघडकीस आला.

नगर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागापूर आणि पिंपळगाव माळवी या ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या. पिंपळगाव माळवी येथील पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघडकीस आला. नागापूर येथे चाकूचा धाक दाखवून एका महिलेवर बलात्कार करण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. 

अल्पवयीन मुलीवर अत्याचार 
पिंपळगाव माळवी येथील तलावाजवळ एका अल्पवयीन मुलीवर आरोपीने एक एप्रिल 2019 रोजी अत्याचार केला. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 
प्रकाश दुर्योधन गांगुर्डे (रा. कन्नड, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि फिर्यादी यांचे कुटुंब मजुरीसाठी पिंपळगाव माळवी येथे आले होते. 

गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघडकीस 
पीडित मुलगी सोळा वर्षांची आहे. आरोपी प्रकाश गांगुर्डे याने पीडितेवर तीन वेळा बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलीने त्याची वाच्यता केली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. अखेर पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. 

तिला चाकूचा धाक दाखविला 
अशाच प्रकारे दुसरी घटना नागापूर येथे घडली. पीडित महिलेच्या घरात घुसून एकाने चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला. ही घटना सोमवारी (ता. 18) घडली. पीडितेच्या फिर्यादीवरून मारुती तुकाराम साबळे (रा. धायतडकवाडी, ता. पाथर्डी) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

गुजरातलाही पळवून नेले 
""पीडिता एकटीच घरी असताना आरोपी तेथे गेला. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याबरोबर राहा, मी तुझा सांभाळ करेन, असे म्हणून त्याने चाकूचा धाक दाखवून अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीला अहमदाबाद (गुजरात) येथे घेऊन गेला. तिथे पीडितेवर अत्याचार केला,'' असे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पीडित मुलीने काल एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape of a minor girl