राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी दीपक गवळी

राजकुमार शहा
गुरुवार, 3 मे 2018

संघटनेची बैठक सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच पार पडली. त्यावेळी या निवडी जाहीर करण्यात आल्या.

मोहोळ - राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या युवक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शेजबाभुळगाव (ता. मोहोळ) येथील युवक कार्यकर्ते दीपक आप्पासाहेब गवळी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र सोलापूर येथे प्रदेशअध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी गवळी यांना प्रदान केले  .
 
संघटनेची बैठक सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच पार पडली. त्यावेळी या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी महासंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी अजय राऊत यांची तर युवक आघाडीच्या प्रदेशउपाध्यक्ष पदी मोहोळ तालुक्यातील दीपक गवळी यांची निवड केल्याचे जाहिर केले.     
यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तुकाराम राऊत, कोषाध्यक्ष प्रशांत कांबळे, जिल्हा युवकअध्यक्ष प्रवीण इरकशेट्टी, बाळासाहेब आळसुंदे, प्रमोद घोडके, शरणाप्पा वाघमारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन प्रदेश उपाध्यक्ष दीपक गवळी यांचा सत्कार करण्यात आला.  

यावेळी महासंघाचे संस्थापकअध्यक्ष माजीमंत्री बबनराव घोलप व आमदार योगेश घोलप यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली राज्यात चर्मकार युवकांना महासंघाच्या प्रवाहातआणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी दिपक गवळी यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title: Rashtriya Charmakar Vice president dipak gavli