मोहोळ पोलिस स्टेशनच्या वतीने राष्ट्रीय एकता दौड

mohol
mohol

मोहोळ - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त मोहोळ पोलिस स्टेशनच्या वतीने राष्ट्रीय एकता दौड, मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. याचे उदघाटन उपविभागीय पोलिस अधिकारी सोलापूर ग्रामीणचे चंद्रकांत खांडवी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक  सुर्यकांत कोकणे उपस्थित होते.

शिवाजी चौक ते पंढरपुर रोडवरील तांबोळे रस्त्याप्रर्यत धावत जात पाच किलोमिटर अंतर पार करत ही रॅली परत शिवाजी चौक येथे आली. या रॅलीमध्ये डी. वाय. एस. पी. चंद्रकांत खांडवी, पो.नि. सुर्यकांत कोकणे यांच्यासह सर्व पोलिस कर्मचारी, डॉ जनानी खान, डॉ अमोल हराळे, डॉ शैलेश झाडबुके, डॉ महेश राऊत, डॉ उमेश मेडगुळे, डॉ जयप्रकाश मोहीते, अँड सुधीर देशपांडे, अॅड कैलास नाईक, अॅड. पांडुरंग माने, पोलिस भरती प्रशिक्षण अॅकेडमीचे राजाराम शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे, खंडु शिंदे, नितीन थेटे, पोलिस कर्मचारी  निलेश देशमुख, मुन्ना बाबर, भाऊ सरवदे, राजेंद्र बुरंगे, जयश्री गायकवाड, सविता अहिरे, होमगार्ड अधिकारी बंडु मोरे, दत्तात्रय मोटे, ट्रॉफीक कर्मचारी, मोहोळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय आठवले, राजशेखर घोंगडे, रामेश्वर स्वामी आदीसह बहुसंख्य विद्यार्थी, प्रतिष्ठीत नागरिक सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com