माळशिरसची ऋतुजा भोसले दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

आज एकेरीचे उर्वरित 12 सामने
डायना मर्सिनकेव्हीचा (लॅटव्हिया) आणि व्लाडा कटीच (इस्त्राईल) 3-6,6-3, 6-1, युई युआन (चीन) वि. वि. प्रांजला यडलापल्ली (भारत) 6-4, 6-4, डारिया मिशीना (रशिया) वि. वि. मिहिका यादव (भारत) 6-3, 7-5, सेंगिझ (टर्की) वि. वि. महक जैन (भारत) 6-3, 6-2. मुख्य फेरीतील पहिल्या फेरीचे एकेरीचे उर्वरित 12 सामने उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून खेळविले जाणार आहेत. 

सोलापूर : प्रिसिजन जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीतील पात्रता फेरीत आज मूळची माळशिरसची असलेल्या ऋतुजा भोसले हिने ग्रेट ब्रिटनच्या स्मिथ एमिली वेबली हिच्या जोडीने दुहेरीत पहिलाच सामना जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला आहे. 

हेही वाचा : भारतीय तायक्‍वांदो संघाला दोन सुवर्ण, सहा रौप्य, तीन ब्रॉंझपदके 

नूडनिडा लुआंगणाम (थायलंड) आणि डायना मेरचीनकेंवीचा (लात्व्हिआ) 6-4, 6-1 असे या जोडीला नमवत ही कामगिरी केली. कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या जिल्हा असोसिएशनच्या मैदानावर प्रिसिजन ओपन जागतिक मानांकन महिलांच्या लॉन टेनिस स्पर्धा सुरू असून ही स्पर्धा 25 हजार अमेरिकन डॉलरची आहे. आज एकेरी आणि दुहेरीचे सामने खेळविण्यात आले. यात आज दुहेरीतही सोलापूरच्या प्रगती सोलनकर हिला पराभवाचा सामना करावा लागला. दुहेरीत भारताच्या प्रतिभा नारायण प्रसाद (भारत) आणि सोहा सादिक या जोडीनेही दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला आहे. 

हेही वाचा : "या' पैलवानाने पटकावले 75 हजाराचे पारितोषिक

 

Image may contain: 1 person, playing a sport and outdoor
जागतिक लॉन टेनिस स्पर्धेत फटका मारताना डायना मेरचीनकेंवीचा. 

दुहेरीचा निकाल 
ऋतुजा भोसले (भारत) आणि स्मिथ एमिली वेबली (ग्रेट ब्रिटन) वि. वि. लुआंगणाम नूडनिडा (थायलंड) आणि डायना मेरचीनकेंवीचा (लात्व्हिआ) 6-4, 6-1, पुन्नीन कोवापिटुकटेड (थायलंड) आणि सवंगकाएव (थायलंड) वि. वि. बुरदिना एवेजनीया (रशिया) आणि कटीच व्लादा (इस्त्राईल) 7-5, 6-3, निमा झोउमा (चीन) आणि युआन युई (चीन) वि. वि. आकांशा नित्तूरे (भारत) आणि प्रगती सोलनकर (भारत) 6-1 6-1, प्रतिभा नारायण प्रसाद (भारत ) आणि सोहा सादिक (भारत ) वि. वि. मुनियन आरती (भारत ) आणि सगवाल अविका (भारत ) 6-2, 6-3, मिशिना डारिया (रशिया ) आणि मोरगिना ऍना (रशिया ) वि. वि. जेनिफर लुईखेम (भारत ) आणि सौम्या विग (भारत ) 6-2, 6-3, सॅन्ड्रा समीर (इजिप्त ) आणि एकत्रिना यशीना (रशिया ) वि. वि. स्टेफि कर्रुथेर्स (सामोआ ) आणि स्नेहल माने (भारत ) 6-2, 7-6(6), सेंगिझ बेर्फु (टर्की ) आणि देस्पिना पापामिचाईल (ग्रीक) वि. वि. फ्रेया ख्रिस्ती (ग्रेट ब्रिटन ) आणि व्हॅलेरिया स्ट्राखोवा (यूक्रेईन ) 6-3, 6-2. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rashuja Bhosale of Malshiras doubles in the second round