मंगळवेढा सांगोला रस्त्यावर ग्रामस्थांचा रास्तारोको

प्रशांत माळी
सोमवार, 18 जून 2018

आंधळगाव : लक्ष्मी दहिवडी येथून मंगळवेढा ते सांगोला रस्त्याला जोडणारा सहा किमी लांबीचा रस्ता ना दुरूस्त अवस्थेत असून यामुळे वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूकी आधी रस्ता दुरूस्त करा, अन्यथा शाळेला मुले पाठवून देणार नाही असा इशारा देत आज (सोमवार) सकाळी दहा वाजता लक्ष्मी दहिवडी फाटा मंगळवेढा सांगोला रोडवर चाळीस धोंडा येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी सह कोकणात जाणारी वाहतूक विस्कळीत झाली.

पोलीस बंदोबस्त तैनात केला असून ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बांधकाम खात्याच्या अधिकाय्राच्या आश्वासनाने आंदोलन थांबवल्याने वाहतूक पूर्ववत झाली.

या रस्त्यासाठी कांबळे वस्ती, शेजाळवस्ती, सोनवले वस्ती, जालगिरे वस्ती, होनमाने वस्ती, जाधव वस्ती, बंदवडे वस्ती,पाटील वस्ती, लिगाडे वस्ती, श्रीराम वस्ती, मेतकूटे वस्ती येथील शंभर नागरिकांच्या सह्यांचे निवेदन आ.भारत भालके कार्यालय, आ.प्रशांत परिचारक, अध्यक्ष समाधान आवताडे, जिल्हाधिकारी प्रांताधिकारी, पोलिस स्टेशन यांना दिले होते.

जत वरून पंढरपूर जाण्यासाठी जवळचा मार्ग असून पाया जाणाय्रा वारकय्राची संख्या देखील वारी कालावधीत जास्त असते या रस्त्याकडे बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांनी पुर्णतः दुर्लक्ष केले असून रस्ता निवडणूकी आधी दुरूस्त करावा संपूर्ण रस्त्यावर खड्डे पडले असून रोज सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व दूध घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.

Web Title: rasta roko agitation at mangalwedha sangola road