मंगळवेढ्यात छावा संघटनेच्या वतीने रास्ता रोको

mangalwedha.
mangalwedha.

मंगळवेढा - तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले असून, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवास धोकादायक होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे निवेदन देवूनही दुर्लक्ष केल्याने अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आज दामाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तासभर आंदोलनामुळे आठवडा बाजारात जाणारी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाले.

मंगळवेढा - बोराळे - सिद्धापूर, मंगळवेढा - निंबोणी - सलगर बुद्रुक या मार्गावर सध्या ऊस वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात आहेत. चालकांचा हलगर्जीपणा आणि कमी रूंदीच्या रस्त्यामुळे येथे अपघात वाढले आहेत. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. शिवाय या दोन्ही मार्गावर रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहे. रस्त्याच्या कडेला साईड पट्टी नाही आणि फिरंगीच्या काट्यामुळे ओव्हरटेक आणि बाजूने जाता येत नाही. पुर्व भागातून वाळूच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल शासनाला मिळून देखील या रस्त्याला मागणीप्रमाणे निधी दिला जात नाही. तर मंगळवेढा- निंबोणी- सलगर या कामाला निधी मिळूनही कामाला सुरुवात केली जात नाही. याच मार्गावर रत्नागिरी नागपूर या महामार्गाच्या ठेकेदाराने आपला वाहनतळ बसला आहे. त्यामुळे त्याची अवजड वाहने देखील याच मार्गावरून ये-जा करणार असल्याने भविष्यात अपघाताचे प्रमाण वाढणार आहे.  या सर्व बाबींकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्यामुळे छावा संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला यापूर्वीही निवेदन दिले होते याही निवेदनाकडे त्यांनी लक्ष न दिल्यामुळे अखेर दामाजी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले 

यावेळी तालुकाध्यक्ष प्रज्वल शिंदे, जि.प.सदस्या शैला गोडसे, सचिन नकाते, दयानंद सोनगे, अमोल गायकवाड, अक्षय पवार, वैभव शिंदे, दत्तात्रय शिंदे, आप्पालाल मुलाणी यांच्यासह ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com