बळीराजा शेतकरी संघटनेचा कऱ्हाडमध्ये रास्तारोको

हेमंत पवार 
गुरुवार, 7 जून 2018

कऱ्हाड : मागील वर्षीच्या शेतकरी संपामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. शेतकऱ्यांची सरकारने फसवणुक केली आहे. त्याचा निषेध म्हणून आणि सध्या सुरु असलेल्या शेतकरी संपाचा एक भाग म्हणून बळीराजा शेतकरी संघटनेने ढेबेवाडी फाट्यावर रास्तारोको आंदोलन केल्याची माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी आज (ता. 7) दिली.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, दुधाला दरवाढ मिळालीच पाहिजे, शेतीपंपाला मोफत वीज मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना मासिक पेन्शन मिळालीच पाहिजे यासह अन्य मागण्यांच्या घोषणा देऊन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, सुनिल कोळी, अविनाश फुके, राजु जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रास्तारोको आंदोलन केले.      

Web Title: rastaroko agitation of baliraja shetkari sanghatana at karhad