भिम युवा प्रतीष्ठानच्या वतीने मोहोळमध्ये रास्तारोको

राजकुमार शहा 
गुरुवार, 7 जून 2018

मोहोळ : (सोलापूर) : मोहोळ शहराजवळ असलेल्या सिमोल्लंघन पांद चौकात भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल करण्यात यावा यासाठी गुरुवारी (ता. 7) भिम युवा प्रतीष्ठानच्या वतीने अध्यक्ष अॅड. विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले दरम्यान भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालकांनी कारवाही बाबतचे लेखी आश्वासन दिल्यानंतर. रास्तारोको मागे घेण्यात आला. 

सिम्मोल्लंघन पांद चौकात शाळा महाविद्यालये तसेच मोठमोठ्या व्यावसायिक यांची दुकाने आहेत त्याच चौकातुन ढोक बाभुळगाव या ठिकाणीही जाण्यासाठी रस्ता आहे, मात्र या ठिकाणी सातत्याने अपघात होताहेत या ठिकाणी आजपर्यंत तीस जणांचा अपघाती मृत्यु झाला आहे. 

या सर्वावर उपाय म्हणून या ठिकाणी उड्डाण पुल किंवा भुयारी मार्ग होणे गरजेचे आहे ही मागणी घेऊन भिम युवा प्रतिष्ठान गेल्या पाच वर्षापासुन लढा देत आहे मात्र याची प्रशासनातील कुणीही दखल घेतली नाही केवळ निवेदन घेऊन अंदोलन कर्त्याची बोळवण केली जात आहे आज याच कारणासाठी रास्ता रोको करण्यात आला अंदोलनाची दखल घेऊन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक दिपक यांनी अंदोलन स्थळी येऊन  येत्या आठ जुलैपासुन कामाला सुरवात करण्यात येणार असल्याचे लेखी अस्वासन दिल्यानंतर अंदोलन मागे घेण्यात आले. 

अंदोलनात गणेश गुरव बापु कमले बाबुराव ढाणके दादा कापुरे नितीन क्षीरसागर, सोमेश बनसोडे, गणेश शिरसट, सिकंदर धोत्रे, राजु अष्टुळ, आकाश कापुरे, प्रशांत उमरदंड, बाळु शिरसट, राजु नागटिळक उपस्थीत होते दिपक यांनी निवेदन स्विकारले. 

Web Title: rastaroko agitation at mohol by bheem yuva pratishthan