दूध दरासाठी काँग्रेसचा रास्तारोको

वसंत कांबळे
बुधवार, 16 मे 2018

कुर्डू (सोलापूर) : शेतकर्‍यांच्या दुधाला सत्तावीस रुपये दर दिलाच पाहिजे, व विविध मागण्यांसाठी माढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लऊळ (ता. माढा) येथे बुधवारी (ता. 16) सकाळी शासनाच्या निषेधार्थ रस्ता रोको व दुध ओतुन निषेध करण्यात आला. 

कुर्डू (सोलापूर) : शेतकर्‍यांच्या दुधाला सत्तावीस रुपये दर दिलाच पाहिजे, व विविध मागण्यांसाठी माढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लऊळ (ता. माढा) येथे बुधवारी (ता. 16) सकाळी शासनाच्या निषेधार्थ रस्ता रोको व दुध ओतुन निषेध करण्यात आला. 

यावेळी काॅग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संदिप साठे, तालुका अध्यक्ष सौदागर जाधव, अल्पसंख्याक अध्यक्ष रफिक शेख, युवा तालुका अध्यक्ष धनंजय मोरे, जिल्हा सरचिटणीस रामभाऊ वाघमारे, विशाल नलवडे, कुर्डुवाडी शहर अध्यक्ष हमीद शिकलकर, सुरेश लोंढे, भुमाता शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मारूती जगदाळे, बालाजी सावंत, आप्पासाहेब सुर्वे, भारत चव्हाण, श्रावण जाधव, युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, जाहीर मणेर, शाहुराजे जगताप, माजी शहराध्यक्ष संजय त्रिंबके आदि मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी शेतकर्‍यांच्या दुध दर शासन नियमाप्रमाणे प्रति लिटर सत्तावीस रुपये मिळाल्या शिवाय शांत बसणार नाही असे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सांगितले व सरकारच्या धोरणावर टिकेची झोड उठवली.  यावेळी संदीप साठे, धनंजय मोरे सौदागर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सुमारे पंचेचाळीस मिनिटे रस्ता आडवला होता त्यामुळे आधिक मास सुरु झाला असल्याने पंढरपूर कडे जाणारऱ्या वाहनांची मोठी रांग लागली होती. या रस्ता रोको साठी परिसरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Web Title: rastaroko for pricing of milk by congress