रेशनिंग दुकानांत बियाणे देण्याचा विचार

हेमंत पवार - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

कऱ्हाड -  राज्यातील शेतकऱ्यांना वेळेत आणि गावातच बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विभागाने गावोगावी असणाऱ्या रेशनिंग दुुकानांतूनच बियाणे उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू केला आहे. 

तसा प्रस्तावही त्यांनी तयार करून तो विचारविनिमयासाठी ठेवला आहे. रेशनिंग दुकानदारांच्या हा निर्णय कसा पचनी पडणार, यावर पुढील गणिते अवलंबून असतील. त्याला कसा आणि किती प्रतिसाद मिळणार, हे कोडंच असले तरी त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गावात बियाणे मिळण्याची चांगली सोय होणार आहे, हे मात्र नक्की. 

शासन शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यत नेण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांनी विविध तंत्रांचा आणि उपक्रमांचा उपयोग सुरू केला आहे. त्याला चांगले यश येत असल्याचेही समोर येत आहे. त्याचबरोबर शासनाकडून येणारे धान्य व अन्य वस्तू थेट सर्वसामान्यांच्या घरात जाव्यात आणि त्यांना त्याचा लाभ गावातच मिळावा, यासाठी पुरवठा विभागाच्या अंतर्गत रेशनिंग धान्य वाटपासाठी दुकाने सुरू करण्यात आली आहेत. त्यासाठी शासनाकडून संबंधितांना परवानेही देण्यात आले आहेत.

रेशनिंग दुकानात बियाणे देण्याचा विचार त्याव्दारे रेशनिंगचे धान्य वाटप केले जाते. ते करताना ग्राहकांच्या अनेक तक्रारी आजही कायम आहेत. त्यातच रेशनिंग धान्य दुकानदारांचेही अनेक प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यामुळे सातत्याने त्यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू असतात. एकीकडे ही स्थिती असताना कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्‍यक असलेले बियाणे वेळेत आणि गावातच उपलब्ध व्हावे, यासाठी गावोगावी असणाऱ्या रेशनिंग दुुकानांतूनच बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू केला आहे. त्याअनुषंगाने कृषी विभागाकडून तशी चाचपणीही सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवरील शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल. कृषी विभागाने तसा प्रस्तावही तयार करून तो विचारविनिमयासाठी ठेवला आहे. मात्र, रेशनिंग दुकानदारांच्या अगोदरच प्रलंबित समस्या असताना ते संबंधित बियाणे विक्रीसाठी ठेवणार का ? त्यांना त्यामध्ये किती कमिशन देण्यात येणार? वाहतूक भाडे कोण देणार? यासारखे अनेक प्रश्‍न अजूनही अनुत्तरित आहेत. त्यामुळे संबंधित विचार दुकानदारांच्या कसा पचनी पडणार, यावर पुढील गणिते अवलंबून असतील. मात्र, कृषी विभागाने टाकलेले पाऊल शेतकऱ्यांच्या भल्याचे ठरणार आहे हे मात्र नक्की.

Web Title: ration shop issue