पावती निघेना अन्‌ धान्यही मिळेना!

आयाज मुल्ला
मंगळवार, 22 मे 2018

वडूज - ऑनलाइन प्रणालीचा वापर करून शासनाने विविध क्षेत्रांत पारदर्शकता आणली असली तरी या ऑनलाईन प्रणालीत अपुऱ्या नेटवर्कची मोठी अडचण ठरत आहे. खटाव, माण तालुक्‍यांतील ग्राहकांना धान्य वितरित करण्यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना पॉस मशिन दिल्या आहेत. मात्र, नेटवर्कच्या अडचणींमुळे ग्राहकांच्या नावाची धान्य खरेदीची पावती निघत नसल्याने दुकानदारांना धान्य देता येत नाही. त्यामुळे अनेक वेळा दुकानदार व ग्राहकांत वादावादीचे प्रसंग घडत आहेत. खटाव तालुक्‍यात १५८ व माण तालुक्‍यात १३९ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. ग्राहकांना धान्य वितरित करण्यासाठी या दुकानदारांना शासनाने पॉस मशिन दिल्या आहेत.

वडूज - ऑनलाइन प्रणालीचा वापर करून शासनाने विविध क्षेत्रांत पारदर्शकता आणली असली तरी या ऑनलाईन प्रणालीत अपुऱ्या नेटवर्कची मोठी अडचण ठरत आहे. खटाव, माण तालुक्‍यांतील ग्राहकांना धान्य वितरित करण्यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना पॉस मशिन दिल्या आहेत. मात्र, नेटवर्कच्या अडचणींमुळे ग्राहकांच्या नावाची धान्य खरेदीची पावती निघत नसल्याने दुकानदारांना धान्य देता येत नाही. त्यामुळे अनेक वेळा दुकानदार व ग्राहकांत वादावादीचे प्रसंग घडत आहेत. खटाव तालुक्‍यात १५८ व माण तालुक्‍यात १३९ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. ग्राहकांना धान्य वितरित करण्यासाठी या दुकानदारांना शासनाने पॉस मशिन दिल्या आहेत. पॉस मशिनवर संबंधित ग्राहकांचे अंगठ्याचे ठसे घेऊन नंतर त्यांच्या नावाची धान्य खरेदीची पावती काढण्यात येते. शासनाने धान्य खरेदीत ऑनलाइन पद्धतीचा वापर केलेल्या या कार्यप्रणालीचे ग्राहकांनी सुरवातीला स्वागत केले. मात्र, दोन्ही तालुक्‍यातील अनेक गावे डोंगराळ तसेच उंच, सखल भागांत व मुख्य दळणवळणाच्या रस्त्यांपासून आत आहेत. त्यामुळे नेटवर्कच्या अडचणींचा मोठा फटका या प्रणालीला बसू लागला आहे. धान्य खरेदीवेळी संबंधित ग्राहकांचे ठसे पॉस मशिनवर उमटण्यात, तसेच त्यांच्या नावाची पावती निघण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना ग्राहकांना धान्य देता येता नसल्याने ग्राहक व दुकानदारांत सातत्याने वादाचे प्रसंग होत आहेत. त्यातही एखाद्या शिधापत्रिकेवर पाच लोकांची नावे असल्यास तीनच लोकांच्या नावाची पावती निघाल्याने तीनच जणांचे धान्य ग्राहकांना घ्यावे लागत आहे. ग्राहकांची अडचण नको म्हणून काही दुकानदार पावती करून ग्राहकांना धान्य देत आहेत.

Web Title: ration shop online process slip grain