रत्नागिरीत हजारो विद्यार्थी रंगले रंगाच्या दुनियेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 डिसेंबर 2017

रत्नागिरी - चिमुकल्यांच्या कल्पना विश्‍वातून रेखाटणाऱ्या चित्रांचा जणू आज उत्सवच होता. निमित्त होते ‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेचे. जिल्ह्यातील साधारण साडेआठहजारावर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतील रंग कागदावर उमटवले. रंग रेषांच्या दुनियेत बच्चेकंपनी अक्षरशः हरखून गेली.

रत्नागिरी - चिमुकल्यांच्या कल्पना विश्‍वातून रेखाटणाऱ्या चित्रांचा जणू आज उत्सवच होता. निमित्त होते ‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेचे. जिल्ह्यातील साधारण साडेआठहजारावर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतील रंग कागदावर उमटवले. रंग रेषांच्या दुनियेत बच्चेकंपनी अक्षरशः हरखून गेली.

घर, शाळा, मोबाईल, कॉम्प्युटर, आईस्क्रिम, किल्ला, गणेशोत्सवावरील वैविध्यपूर्ण चित्रे मुलांनी रंगांच्या विविध छटांनी चितारली. 

मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, या सुप्त उद्देशाने ‘सकाळ समूहा’तर्फे दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते. ‘सकाळ’ची चित्रकला स्पर्धा म्हटली की जिल्ह्यातील अनेक शाळांकडून बहुमूल्य सहकार्य लाभते. कला शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यातून ही स्पर्धा यशस्वी झाली. जिल्ह्यातील ३७ केंद्रावर एकाचवेळी स्पर्धा घेण्यात आली.

पहिली-दुसरीच्या गटासाटी माझे घर, माझे आवडते खेळणे, माझी शाळा, माझा मोबाईल, वन लाईफ लव्हईट असे विषय होते. त्यापैकी विद्यार्थ्यांनी शाळा, घर व मोबाईलला पसंती दर्शवली. काही विद्यार्थ्यांनी लव्हईट कॅडबरीचे सुरेख चित्र रेखाटले. तिसरी-चौथीसाठी मी पतंग उडवतो, किल्ला, खेळण्यांची दुनिया, आईस्क्रिमची दुनिया, वन लाईफ लव्हईट असे विषय होते. पतंग, किल्ला आणि आईस्क्रिम चितारण्यात बच्चेकंपनी दंग होती.

पाचवी ते सातवीसाठी माझा आवडता सण, जंगल, रस्ता सुरक्षा, भाजीवाला, भाजीमंडई, वन लाईफ, लव्हईट असे विषय होते. आवडता सण गणेशोत्सव, शिमगा, भाजीवाल्याचे सुरेख चित्र विद्यार्थ्यांनी काढले व रंगवले. आठवी ते दहावीसाठी शाळेच्या प्रयोगशाळेत, पावसातील दृष्य, कॉम्प्युटर गेम, शेकोटी, वन लाईफ, लव्हईट असे विषय होते. हे सर्वच विषय आव्हानात्मक होते. विद्यार्थ्यांनी ही सर्व चित्रे साकारल्याचे दिसत होते. पावसाळ्यातील दृश्‍यामध्ये विद्यार्थ्यांनी नावीन्य दाखवले. कॉम्प्युटर गेमचेही सुरेख चित्र चितारले.

शिक्षकांसह कर्मचारी, स्वयंसेवक, पालकांचे सहकार्य
जिल्ह्यातील विविध केंद्रावर आयोजित स्पर्धेला शाळेतील शिक्षक, कर्मचारी, एनएसएसचे स्वयंसेवक, पालकांनी अमुल्य मदत केली. कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात मुख्याध्यापिका सौ. शीतल काळे, शिक्षक सुधीर शिंदे, सोमनाथ दुकले, श्री. चव्हाण, नवनिर्माण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी जुवेरिया खान, दर्शना सागवेकर, पालक प्रतिनिधी मिलिंद लोटणकर, साक्षी वांदरकर, साळुंके मावशी यांचे सहकार्य लाभले. मकरंद पटवर्धन, मंगेश मोरे यांनी केंद्राचे व्यवस्थापन केले. परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिर केंद्रावर शाळेचे शिक्षक विनोद नारकर, रोहिणी कांबळे, दिलीप भाताडे, नीलेश पावसकर, श्रीमती मांजरेकर, नवनिर्माण महाविद्यालयातील विद्यार्थिनी सोनाली पोटफोडे, प्रतीक्षा जाधव, तसेच रुणाली आयरे, विजय किनरे, विनोद कदम, श्रावणी पाटील, ‘सकाळ’चे संदेश पटवर्धन, महादेव तुरंबेकर यांनी ‘सकाळ’च्या बालमित्र चित्रकला स्पर्धेसाठी सहकार्य केले.

रा. भा. शिर्के प्रशाला केंद्रात केंद्र प्रमुख राजेश शेळके, संजय पंडित, शिक्षक हनमंत ऐवळे, छोटाराम सूर्यवंशी, शिर्के हायस्कूलचे उपमुख्याध्यापक सी. एस. पाटील, कलाशिक्षक उदय लिंगायत, गायत्री अवघडे, विद्या पवार (शिक्षीका) आणि स्वयंसेविका म्हणून प्रणाली कदम आणि सुचिता बसवणकर, यांचे सहकार्य लाभले.

खेडशी येथील महालक्ष्मी विद्यामंदिरात केंद्रप्रमुख संजय पंडित, राजेश शेळके, शिक्षक श्री. देसाई, श्री. शिंदे स्वयंसेवक मनोज पाटील, श्रद्धा ठावरे, विद्या कुळये, मानसी देसाई यांनी सहकार्य केले.

जागुष्टे हायस्कूल व कुवारबाव येथील जि. प. शाळा क्र. १ मध्ये येथे मुख्याध्यापक चंद्रकांत कदम, श्री. इनामदार, श्री. घवाळी, सुवर्णा नाटेकर, आदिती पाटणकर, दर्पणा तारवे, संतोष भुवड, संतोषी बिर्जे, दिलीप देवळेकर, जयश्री कदम, प्रथमेश बारगुडे, अर्जुन राठोड, ऋषीकेश येरमे यांच्यासह राजू चव्हाण, राजेश कळंबटे यांनी स्पर्धा घेतली.

लांजा- चित्रकला स्पर्धेला लांजा केंद्रात उदंड प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील चिमुकल्यांना शुभेच्छा देण्यासाठी लांजा पंचायत समितीच्या सभापती सौ. दीपाली दळवी-साळवी, लांजा नगराध्यक्ष राजू कुरूप, शिक्षक समितीचे जिल्हा नेते अरविंद जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत मणचेकर, शिवसेनेचे नेते दत्ता कदम, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष उमेश केसरकर, शंकर रणदिवे, शिवसेनेचे विभागप्रमुख विश्वास मांडवकर, महिला शहरप्रमुख सौ. छाया गांगण आदींनी भेट दिली.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मॉडेल स्कूल लांजा नं. ५ च्या मुख्याध्यापक सौ. विमल चव्हाण, विलास चाळके, सकाळचे लांजा प्रतिनिधी रवींद्र साळवी आदींसह शिक्षकांनी परिश्रम घेतले. संगमेश्‍वर येथील पैसाफंड हायस्कूलमध्ये तब्बल ४६८ विद्यार्थी सहभागी झाले होते. या केंद्रावर ‘सकाळ’चे रत्नागिरी आवृत्तीप्रमुख शिरीष दामले, बातमीदार संदेश सप्रे यांच्यासह जे. डी. पराडकर यांनी विशेष सहकार्य केले.

Web Title: Ratnagiri News Sakal Chitrakala competition