प्रकल्प अधिकारीपदी रवी पवारांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

सातारा - पुणे महापालिकेतील उपायुक्त रवी पवार यांची जिल्हा प्रकल्प अधिकारीपदी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती झाली आहे. त्यांनी नुकताच येथील पदभार स्वीकारला. दीर्घ कालावधीनंतर येथे या पदावर पूर्णवेळ अधिकारी मिळाला आहे.

जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये समन्वयक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हा प्रकल्प अधिकारी काम पाहतात. किरण यादव यांच्या बदलीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात या पदावर पूर्णवेळ अधिकारी नव्हता. नुकतीच श्री. पवार यांची येथे बदली झाली. यापूर्वी पुणे महापालिकेत सहायक आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. तत्पूर्वी त्यांनी बारामती, परभणी व उस्मानाबाद येथे मुख्याधिकारीपदी काम पाहिले आहे. 

Web Title: Ravi Pawar appointment as Project Officer