'दोन वर्षांत रेमंड-इंडोकाउंटसारखा प्रकल्प उभारणार' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

सेनापती कापशी - कागल तालुक्‍यातील साडेतीन ते चार हजार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी रेमंड व इंडोकाउंटसारखा औद्योगिक प्रकल्प उभारणार असल्याची ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. तसेच बारवे-दिंडेवाडी प्रकल्प मीच पूर्ण करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

सेनापती कापशी (ता. कागल) येथे राष्ट्रवादीचे उमेदवार शिल्पा खोत व पंचायत समितीच्या उमेदवार दीपाली शिंदे, ज्योती दादू मुसळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रवीणसिंह पाटील होते. 

आमदार मुश्रीफ म्हणाले, ""आपण सुरवातीला शाहू, हमिदवाडा साखर कारखाना उभारणीस हातभार लावला. नंतरच्या राजकीय परिस्थितीमुळे त्या ठिकाणी राहता आले नाही. म्हणूनच आपणा सर्वांच्या पाठबळावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उभारणी केली. येथेही तरुणांच्या हाताला काम मिळाले. शिवाय आमदार झाल्यानंतर कागलला साडेतीन हजार हेक्‍टरवर पंचतारांकित औद्योगिक वसाहत वसवली. या ठिकाणी हजारो तरुणांना काम मिळाले. आपल्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या सहकारी संस्था व इतर संस्थांमध्ये युवकांना काम देऊ शकलो. येत्या दोन वर्षांत इंडोकाउंट, रेमंडसारखा हजारो युवकांना रोजगार देणारा प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न राहील.'' 

पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, प्रवीणसिंह पाटील, राजू लाटकर, सूर्याजी घोरपडे, बाळासाहेब नाईकवडी, तजिन देसाई, प्रवीण नाईकवडी, उमेदवार शिल्पा खोत यांनी मनोगत व्यक्त केले. सभेस नावीद मुश्रीफ, अंकुश पाटील, नेताजी मोरे, परशराम शिंदे, गिरीश कुलकर्णी, सागर पाटील उपस्थित होते. 

दत्ताजीराव घाटगे बोगस स्किम... 
पुण्यात राहून या भागाचे राजकारण करणाऱ्यांना तुम्ही थाराच कसा देता, असा सवाल करून आमदार मुश्रीफ म्हणाले, ""दत्ताजीराव घाटगे हे बोगस स्किम आहे. त्यांना पैशाची मग्रुरी आली आहे. ही मग्रुरी उतरवण्यासाठी या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त करा.

Web Title: Raymond-indokaunta similar project set up two years