विटा येथील मोबाईल शाॅपी मालकाचा का झाला खून ?

Reason Of Mobile Shoppe Owner Murder Sangli News
Reason Of Mobile Shoppe Owner Murder Sangli News

इचलकरंजी -  विटा (ता.खानापूर, जि.सांगली) येथील साई मोबाईल शॉपीचा मालक बालाजी करांडे (वय 27, रा. सागर भेंडवडे, ता.खानापूर) याच्या खून प्रकरणाचा छडा येथील शिवाजीनगर पोलिसांना लावला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. दुचाकीला कट मारण्याच्या वादातून 6 नोव्हेंबररोजी रात्री ही खुनाची घटना घडली होती.

या प्रकरणी ओंकार उर्फ मुरली दशरथ गेजगे (वय 21, रा. साईनगर, शहापूर), सागर रामचंद्र आयवळे (19) व रोहन उर्फ चिक्‍या बापुराव रावतळे (19, दोघेही राहणार घानवड, ता.खानापूर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पुढील तपासासाठी विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबतची माहिती पोलीस निरिक्षक ईश्‍वर ओमासे यांनी आज पत्रकारांना दिली.

घटनेची सविस्तर माहिती अशी - 

घानवड येथे या घटनेतील मुख्य संशयीत गेजगे याची आत्या लक्ष्मी शंकर जावीर राहते. त्यांच्याकडे गेजगे हा येत-जात असतो. त्यातून या गावातील उर्वरीत दोन संशयितांबरोबर गेजगेची मैत्री झाली होती. तिघेही दुचाकीवरुन साळशिंगी रोडवरील शिवतारा धाब्यावर जेवण्यासाठी चालले होते. त्याच वेळी करांडे व संशयितांची मोटर सायकलीला कट मारण्याच्या कारणातून वाद झाला.

या वादातून पाठलाग करुन करांडे याचा चाकूने वार करुन खून केला. मुख्य संशयीत गेजगे यांने आपल्याकडील चाकूने त्याला भोसकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेनंतर सर्व संशयीत पसार झाले होते. याबाबतचा सुगावा येथील शिवाजीनगर पोलिसांना लागला. 

घटनेनंतर गुन्ह्यातील चाकू संशयितांनी घटनास्थळ परिसरात असलेल्या ओढ्यात टाकल्याचे कबूल केले आहे. रावतळे व आयवळे हे महाविद्यालयीन तरुण आहेत. या कारवाईत पोलीस उप निरिक्षक फरास, पोलीस कर्मचारी उदय पाटील, प्रशांत ओतारी, विजय मावळदे यांनी भाग घेतला. 

गेजगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार
गेजगे याच्यावर यापूर्वी शहापूर पोलिसांत कोयता जवळ बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. या खूनाच्या घटनेतील हाच मुख्य संशयीत आहे. या प्रकरणातील उर्वरीत दोन संशयितांना त्यांने खूनाची वाच्यता न करण्याबद्दल धमकावल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

संबंधीत बातमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com