बंडखोरी मागे घेतली नाही, तर कारवाईचा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

सांगली - विधान परिषदेसाठी कॉंग्रेसकडून जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम हे अधिकृत उमेदवार आहेत. या निवडणुकीत पक्षाचे हित महत्त्वाचे आहे. तरीही बंडखोर उमेदवाराने माघार घेतली नाही, तर पक्षपातळीवर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला. 

वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त खासदार अशोक चव्हाण सांगलीत आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून मोहनराव कदम यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. बंडखोर उमेदवाराने माघार घ्यावी यासाठी चर्चा करू; पण आधी पक्षहित महत्त्वाचे. पक्षासाठी त्यांनी माघार घ्यावी. चुकीचा निर्णय घेतल्यास पक्षपातळीवर कारवाईचा निर्णय घेतला जाईल. त्यांच्यावर कारवाई होऊ नये अशी अपेक्षा आहे.'' 

ते म्हणाले,""वसंतदादांचे जन्मशताब्दी वर्ष पक्षाच्या वतीने साजरे केले जाणार आहे. प्रशासन आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोठे कार्य केले आहे. त्यांची प्रेरणा घेऊन कॉंग्रेस संघटित करण्याचे काम करणार आहे. त्याची सुरवात सांगलीतून होईल. दादांच्या कारकिर्दीत सहकारी चळवळीला बळ मिळाले. त्या संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत. मात्र, विद्यमान सरकार त्याला हरताळ फासत आहे.'' 

नगरसेवकांवर कारवाईचे संकेत 
बंडखोर उमेदवारांसोबत गेलेल्या नगरसेवकांवरही पक्ष कारवाई करणार असल्याचे संकेत आहेत. पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत बंडखोरीबाबत गांभीर्याने चर्चा झाली. पक्षविरोधात काम करणाऱ्या नगरसेवकांवरही कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. 

Web Title: Rebellion is not withdrawn, the action against the decision