पानसरे हत्या तपासप्रकरणी निष्काळजीपणाच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर-  ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या होऊन दोन ते तीन वर्षे उलटूनही अद्यापही तपासात काही प्रगती नाही. पोलिस, प्रशासन व सरकार यांच्यामध्येच निष्काळजीपणा दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही अजून किती वाट पाहायची हा प्रश्‍न आहे, म्हणून तपासी यंत्रणा काय करीत आहेत? पुढे काय करणार आहेत? याची माहिती द्यावी, अशा मागणी करणारे 400 सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना देण्यात आले. यामध्ये पानसरे परिवार व भारतीय कम्युनिस्ट पक्षासह देशभरातील लेखक, कलावंतांनी सह्या केल्या आहेत.

ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. ज्येष्ठ नेत्यांच्या हत्यांच्या तपासाची अशी परिस्थिती असेल, तर सामान्य माणसाचे काय होत असेल, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. ऍड. पानसरे व दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी दोन संशयित मिळाल्याचे तपास यंत्रणा सांगते. मात्र अद्यापही ते सूत्रधारापर्यंत पोचलेले नाहीत; तर डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी अद्याप कोणीही सापडलेले नाही. स्कॉटलंड पोलिसांची मदत घेऊनही ही परिस्थिती असल्याने तपासाची माहिती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या वेळी प्रशासन पूर्ण ताकदीनिशी या प्रकरणाचा तपास करीत आहे. त्याचे तपशील पोलिसांकडेही मिळू शकतील. आपले निवेदन त्यातील मागण्या शासनाकडे पाठविण्यात येईल, असे डॉ. सैनी यांनी सांगितले.
---
...त्यानंतर शिष्टमंडळाला प्रवेश
शिष्टमंडळातील काही मोजक्‍या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात प्रवेश दिला. तर काही ज्येष्ठांना कक्षाबाहेर थांबविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. या वेळी उदय नारकर यांनी आम्हाला भेट नको असे म्हणत आम्ही जातो असा पवित्रा घेतला. डॉ. एन. डी. पाटील यांनी घटनेचे गांभीर्य काय आहे, आलेले लोक कोणत्या भावनेतून येथे आले आहेत, याचा थोडा तरी विचार करा, असे सांगताच पोलिसांनी सर्वांना आत सोडले.

Web Title: recklessness in pansare murder case