सलग 25 तास अध्यापनाचा साताऱ्यातील युवकाचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

सातारा : येथील यशेंद्र क्षीरसागर यांनी सलग 25 तास अध्यापनाचा उपक्रम राबवला. या उपक्रमाची नुकतीच गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दखल घेतली असून, तसे प्रमाणपत्र गोल्डन बुकचे आशिया खंडाचे परीक्षक रजतकुमार यांनी उपक्रम यशस्वी झाल्यावर क्षीरसागर यांना सातारा येथे प्रदान केले.

येथील दिशा ऍकॅडमीमध्ये यशेंद्र क्षीरसागर यांनी सलग 25 तास अध्यापन केले. युवा करिअर ऍकॅडमीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी इतिहास, भूगोल, समाजिकशास्त्र आदी विषयांचे अध्यापन केले. यासाठी युवा ऍकॅडमी, दिशा ऍकॅडमी, संस्कृती कला अकादमी यांनी सहकार्य केले. शैक्षणिक आवडीतून हा अभिनव उपक्रम राबविला असून, या निमित्ताने सातारा शहराचे नाव जागतिक स्तरावर जाणार असल्याचा मोठा आनंद वाटतो, अशा भावना क्षीरसागर यांनी व्यक्‍त केल्या. सलग दिवस-रात्र अध्यापनासाठी चक्रीय पद्धतीने विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मोलाचे सहकार्य केले. भारत भोसले, विश्‍वास मोरे, रमेश घनवट, अभिजित भिसे या वेळी उपस्थित होते.

Web Title: record of teaching 25 hours continuously