कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना रेड अलर्ट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. यातून ८ हजार ५४० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राजाराम बंधारा येथील पंचगंगा नदीची पातळी 32 फुटांपर्यंत आहे

कोल्हापूर - जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. यातून ८ हजार ५४० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राजाराम बंधारा येथील पंचगंगा नदीची पातळी 32 फुटांपर्यंत आहे, तर याचा बंधाऱ्यावरील इशारा पातळी  39 फूट तर धोक्‍याची पातळी 43 फूट आहे. त्यामुळे सद्य:स्थिती नियंत्रणात असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता पाळावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

दरम्यान, सांगली येथे सकाळी सहा वाजता कृष्णा पूल कराड पाणी पातळी  24फुट  10 इंच, भिलवडी बंधारा पाणी पातळी - 35 फूट 8 इंच, आयर्विन पाणी पातळी 28 फुट 2 इंच, राजापूर बंधारा सांगली 29 फुट  3 इंच इतकी आहे. 

धरणातून होणारा विसर्ग -  

  • कोयना धरण - विसर्ग 70404 क्युसेक
  • वारणा धरण - विसर्ग - 14476 क्युसेक
  • अलमट्टी धरण - विसर्ग - 185095 क्युसेक

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील चार जिल्हा मार्ग वाहतुकीस बंद केले आहेत, तर जुन्या शिवाजी पुलावरील वाहतूकही बंद ठेवली आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी, तर कोल्हापूर आणि सातारा घाट क्षेत्रात आज आणि उद्या अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Red alert in Kolhapur, Sangli Due to heavy rains