मिरची घेताय, जरा जपूनच 

mirchi
mirchi

परराज्यातील व्यापारी रस्त्यावर - लक्ष्मीपुरीतील मूळ व्यापाऱ्यांवर गदा 

कोल्हापूर -  तिखट मिरचीचा ठसका अधिक झोंबतो असे म्हटले जाते. उन्हाळ्याची चाहूल लागली की ब्याडगी आणि जवारी मिरचीच्या खरेदीची धामधूम सुरू होते. वर्षाचे तिखट एकदम करावे, असा यामागील हेतू असतो. आताचे लक्ष्मीपुरी आणि जुन्या मिरची व्यापार बाजार समितीचे नियमन उठल्यामुळे व्यापार अडचणीत आला आहे. मोक्‍याच्या ठिकाणी जागा दिसेल तेथे लाल भडक मिरचीचा व्यापार सुरू झाला आहे. मात्र, विकणारे खरंच शेतकरी आहेत की व्यापारी, असा सवाल व्यापाऱ्यांतून व्यक्त होऊ लागला आहे. 

"नाव गाव कशाला पुसता मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची' हे गाणे आजही ओठावर रुळते त्यामागे "मिरची' हा शब्द महत्त्वाचा आहे. लक्ष्मीपुरीतील मिरची बाजाराला याच कारणास्तव महत्त्व आहे. फेब्रुवारी-मार्च उजाडला आणि लक्ष्मीपुरीतून फेरफटका मारला की लाल भडक मिरची नजरेस पडते. येथून ये-जा करऱ्यांना ठसका यायलाच हवा इतका मिरचीचा तडका कडक असतो. बाजार घाऊक दरासाठी प्रसिद्ध आहे. लक्ष्मीपुरीसह गडहिंग्लज-निपाणी येथे मिरची खरेदीसाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. 

लक्ष्मीपुरी बाजारातील व्यापारी परवानाधारक आहेत. 
शेतीमाल खरेदीवरील नियमन उठल्यापासून भाजीपाल्यासह अन्य छोटा-मोठा व्यापारही रस्त्यावर आल्याचे चित्र आहे. पूर्वी पालेभाजी खरेदीसाठी लोकांना मंडईत जावे लागत होते, आता ज्या भागात लोक राहतात तेथे हाकेच्या अंतरावर भाजी विक्रेते भेटू लागले आहेत. शेतकऱ्यांसाठी ही बाब निश्‍चितपणे स्वागतार्ह आहे. मात्र, मिरचीच्या दुनियतेही असा व्यापार मूळ व्यापाऱ्यांच्या अडचणीत भर घालणारा ठरू लागला आहे. शहराच्या विविध भागांत परराज्यातील मिरची विकतात ते शेतकरी आहेत की व्यापारी आहेत, याची चिंता मूळ व्यापाऱ्यांना लागून राहिली आहे. 

तेथे मापात पाप होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही, असे त्यांचे मत आहे. दहा किलो मिरची घेतली की सात ते आठ किलोच पदरात पडते. हायब्रीड मिरची अशी आहे की दोन महिन्यांनंतर तिखटाचा रंग कमी होऊ लागतो. व्यापाऱ्यांकडे कुठलाही फिरता परवाना नाही. वजन मापे तपासून घेतलेली नाहीत, अशा स्थितीत लोकांची फसवणूक टाळण्यासाठी व्यापारावर नियंत्रण ठेवावे, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. त्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच बाजार समिती सदस्यांची भेट घेऊन यासंबंधी चर्चा केली. बाजारात सध्या ब्याडगी मिरचीचा दर प्रतिकिलो दोनशे रुपये इतका आहे. जवारी मिरचीचा दर 350 रुपये प्रतिकिलो (संकेश्‍वरी), गंठूरचा दर 80 ते 90 रुपये इतका आहे. हायब्रीड मिरची शंभर रुपये किलो दराने विकली जात आहे. 

उपनगरात अथवा वर्दळीच्या ठिकाणी परराज्यातील व्यापारी बस्तान बसवू लागले आहेत. व्यापार कुणीही करू शकतो. मात्र, रस्त्यावरील व्यापाऱ्यांकडे कुठलाही परवाना नाही. दहा किलो मिरची घेतली तर वजन सात ते आठ किलोच भरते. यातून लोकांची फसवणूक होते. हायब्रीड मिरची घेतली की दोन महिन्यांत चटणीचा रंग उतरण्यास सुरवात होते. लोक अपेक्षेने मिरची खरेदी करतात त्यांची फसवणूक होऊ नये, अशा व्यापारावर बाजार समिती असो अथवा अन्य शासकीय यंत्रणा बंधन आणावे. 
- धन्यकुमार चव्हाण, मिरची व्यापारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com