कलेढोण गणातील गावांना पाणी देण्यास नकार : मेघा पुकळे

water.jpg
water.jpg

मायणी : कलेढोण गणातील १४ गावांना सिंचनासाठी टेंभुचे पाणी मिळावे. अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली. त्यांनी कार्यवाहीचे आदेशही दिले. मात्र टेंभुऐवजी पाटबंधारे विभागाने उरमोडी प्रकल्पाचे पाणी देण्यात येणार्‍या समस्यांचा पाढा सातारा पाटबंधारे विभागाने वाचुन दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळल्याची संतप्त भावना पंचायत समिती सदस्या मेघा पुकळे यांनी 'सकाळ'जवळ व्यक्त केली. 


कलेढोण गणातील गावांना कोणत्याही सिंचन योजनेचा लाभ मिळालेला नाही. लोक पाणीटंचाईने हैराण झाले आहेत. ठिकठिकाणी प्रशासनाकडून टँकर सुरु केलेत. मात्र त्यावर लाखो रुपयांचा खर्च होऊनही सर्वाची तहान भागत नाही. याच भागात सातशे ते साडेसातशे एकरांवर द्राक्षबागांतून प्रतिवर्षी शेकडो टन द्राक्ष मालाची परदेशात निर्यात होत असते. त्याद्वारे परकीय चलन मिळत असते. मात्र पाण्याअभावी शेती मोडीत निघू लागली आहे. जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षात पुरेसा पाऊसच झालेला नाही. त्यामुळे कलेढोण, मुळीकवाडी, पाचवड, विखळे, गारळेवाडी, गारुडी, तरसवाडी, ढोकळवाडी, पडळ, औतडवाडी, कान्हरवाडी, हिवरवाडी, अनफळे, कानकात्रे आदि गावांना कायमच टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या गावांना सिंचनासाठी टेंभु योजनेतून पाणी देण्याची मागणी मेघा पुकळे यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली होती. त्यांनी खाजगी सचिवांमार्फत सातारा पाटबंधारे विभागाला कार्यवाहीचे आदेश दिले. मात्र सदरची गावे उरमोडी प्रकल्पाच्या अधिसुची लाभ क्षेत्राबाहेर आहेत. पाण्याचे वाटप झाले असुन त्या गावांना लाभ देण्यासाठी प्रकल्पात पाणी शिल्लक नाही. संबंधित गावांचे भुतलाक खटावमधील ७० किलोमीटर कालव्य‍ाच्य‍ा तळ पातळीपेक्षा ७० - ७५ मी. उंच आहे. परिणामी प्रवाही प्रद्धतीने पाणी देता येणार नाही. असा क्षेत्रीय अहवाल पाटबंधारे विभागाने मंत्री महोदयांना दिला आहे.

खरे तर टेंभु योजनेचा मुख्य कालवा कलेढोणलगतच्या गारळेवाडी हद्दीतुन जातो. तेथुन टेंभुचे पाणी देणे सहज शक्य असताना अधिकार्‍यांनी उरमोडीचे पाणी देता येणार नसल्य‍ाचा अहवाल दिल‍ा आहे. त्यामुळे मागितले टेंभुचे,  अन् नकार उरमोडीच्या पाण्याला या हास्यास्पद प्रकाराने मेघा पुकळे व भागातील शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com