नोंदणीकृत दलालांनाच द्राक्षे देण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

तासगाव - नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर द्राक्ष विक्री व्यवहार सुरळीत पार पडावा व द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी. यासाठी द्राक्ष खरेदीसाठी येणाऱ्या दलालांची शासनाकडून अधिकृत नोंदणी करून परवाने देण्याचा व अशाच व्यापाऱ्यांना द्राक्षे द्यावीत, असे आवाहन द्राक्षबागायतदार, तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आले. 

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील, तालुका कृषी अधिकारी आर. बी. शिंदे, पांडुरंग जाधव व तालुक्‍यातील द्राक्षबागातयतदारांची बैठक पार पडली. या वेळी दरवर्षी द्राक्ष बागायतदारांची दलालांकडून होणारी फसवणूक, यावर्षी नोटाबंदीमुळे पैशाचे निर्माण झालेले संकट यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर दलालांचा ज्या गावातील दुकान आहे, त्या दुकानाचा परवाना, आधारकार्ड, तालुक्‍यातील ओळखीच्या जामीनदाराचे हमीपत्र, खरेदीसाठी बिलबुक, चलनबुक, खरेदी परवाना, मोबाईल नंबर याशिवाय बॅंकेत पैसे असल्याची खात्री केल्याशिवाय चेक स्वीकारू नयेत. शेतकऱ्यांमध्ये त्यासाठी प्रबोधन करावे, शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे फलक गावोगावी लावण्यात यावेत, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या. 

याबाबत कृषी पणन राज्यमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी आणि पोलिसांना निवेदन देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी बैठकीमध्ये अविनाश पाटील, पांडुरंग जाधव, आर. बी. शिंदे, शैलेंद्र शिंदे मणेराजुरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबूराव जाधव, डॉ. खाडे (कवठेएकंद), विलास शिंदे, उल्हास जाधव, अमर माने, अरविंद थोरबोले समीर कोळी, शरद शेळके, अर्जुन थोरात, तसेच तालुक्‍यातील द्राक्षबागातयदार शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Registered agent appealed to the grapes