हमीभाव मका खरेदी नाव नोंदणी सुरु

हुकूम मुलाणी
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

मंगळवेढा - तालुका खरेदी विक्री संघ व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्यावतीने हमीभाव मका खरेदी नाव नोंदणी आज दि १४ नोव्हेंबर पासून ऑनलाइन पद्धतीने सुरु होत आहे. या केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे यांनी केले.

मंगळवेढा - तालुका खरेदी विक्री संघ व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्यावतीने हमीभाव मका खरेदी नाव नोंदणी आज दि १४ नोव्हेंबर पासून ऑनलाइन पद्धतीने सुरु होत आहे. या केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे यांनी केले.

यंदाच्या हंगामात आधारभूत किंमत प्रती क्विंटल १७०० रु असून ऑनलाईन नाव नोंदणी साठी ७/१२ उतारा, पिकपाणी दाखला,मूळ आधारकार्ड, मूळ बँक खाते पुस्तक आणि या सर्वांच्या सत्यप्रती (झेरॉक्स) व मोबाइल नंबरसह नोंदणी करणे आवश्यक आहे. एसएमएस प्राप्त शेतकर्‍यांनी मका विक्री साठी हमीभाव केंद्रावर आणायची आहे.खरेदी केलेल्या मकेची रक्कम ऑनलाइन आपण दिलेल्या खात्यावर जमा होणार आहे.

गेल्यावर्षी मंगळवेढा हमीभाव खरेदी केंद्रावर तालुक्यासह जिल्ह्यामधील इतर शेतकर्यांना हरभरा खरेदी ७४९७ क्विंटल खरेदी झालेली होती. त्याची एकूण रक्कम ३ कोटी ४९ लाख ७० हजार तूर खरेदी ८८४० क्विंटल झालेली होती. त्याची एकूण रक्कम ४ कोटी ८१ लाख ७५ हजार तसेच मका खरेदी क्विंटल १४१८४ झालेली होती. त्याची एकूण रक्कम २ कोटी ७ लाख ७९ हजार असे एकूण १० कोटी ३९ लाख इतकी रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा केल्यामुळे शेतकय्रांचा विश्वास वाढला. २०१७-१८ मध्ये किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत NeML पोर्टलवर नोंदणी केलेल्या ज्या शेतकय्राकडून खरेदी न झालेला हरभरा प्रती क्विंटल १००० रु प्रमाणे अर्थसहाय्य मिळणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने १ नोवेंबर २०१८ रोजी पारित केलेल्या शासन निर्णयास अनुसरून सदरची रक्कम मिळवून देणे साठी खरेदी विक्री संघामार्फत पाठपुरावा सुरु असून लवकरच ही रक्कम शेकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष  सिद्धेश्वर आवताडे यांनी दिली.

Web Title: registration for corn rate started