राज्यात खत टंचाई; या जिल्ह्यात मात्र दिलासा.... पुरवठा करून इतके खत शिल्लक

विष्णू मोहिते
Friday, 17 July 2020

सांगली जिल्ह्यात रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.

सांगली : राज्यात रासायनिक खताची टंचाई आणि लिकिंगने खत विक्रीबद्दलच्या तक्रारीचा विषय गाजत आहे. त्याचवेळी जिल्ह्यात रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. खरीप हंगामासाठी एक लाख 26 हजार 230 टन अशा मागणीपैकी आतापर्यंत 92 हजार 647 टन खते उपलब्ध करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे सोमवारपर्यंत त्यातील 35 हजार टन खते शिल्लक आहेत. कृषी विभागाचे नियोजन, खत कंपन्याकडून एजन्सीना मागणीप्रमाणे खते मिळताहेत. सांगली जिल्ह्याची सध्या परस्थितीत तरी खत टंचाईतून सुटका झाली आहे. 

यंदा खरीपाच्या पार्श्‍वभूमीवर पहिल्यापासूनच रासायनिक खताची राज्यात टंचाई ओरड आहे. त्यावेळपासून जिल्ह्यात पुरेशी उपलब्धता आहे. त्याच्या मूळ संशोधनात जायचे म्हटले, तर नियोजन आणि जिल्ह्यातील एजन्सींना मागणीप्रमाणे पुरवठा याला महत्व द्यावे आहे. विशेष म्हणजे हमाल यांच्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वेतून आलेली खते थेट तालुका आणि पुरवठादारांकडे पाठवण्यात आलीत. अन्य वेळी प्रथम सांगलीतील एजन्सी आणि नंतर ती खते तालुका आणि अन्य एजन्सीकडे पाठवली जात होती. यंदा कृषी विभागाने शेतकरी गटांनी एकत्रीत मागणी केल्यास बांधावर म्हणजे शेतकरी गटांनी जिथे खतांची मागणी केली त्या ठिकाणी आहे त्या किंमतीत खते उपलब्ध करुन दिली आहेत. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 15 हजार शेतकऱ्यांना 6 हजार 966 टन खते बांधावर पोहोच केलीत. त्यामुळे लिंकिंग आणि जादा दराचा विषयच उरला नाही. 

हवा तेवढाच युरिया... 

युरिया टंचाईबाबत काही किरकोळ तक्रारी प्रशासनाकडे होत्या. एकाचवेळी वाहतुकीसाठी सोपे जावे म्हणून काही बडे शेतकरी वर्षासाठी हवा असणाऱ्या युरिया एकाचवेळी ( टंचाईची भितीनेही) मागणी करीत होते. एजन्सी व दुकानदारांनी ही बाब कृषीच्या लक्षात आणून देवून सध्या हवे तेवढा युरिया मात्र त्यांना दिलेला आहे. वाहतुक खर्च वाचवण्यासाठी तीन-चार पटीने मागणी दुकानदारांनी वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली आहे. 
चौकट... 

भांडवल उपलब्ध झाल्यामुळे खत टंचाईवर मात

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हमालाची वैद्यकीय तपासणी, नियम पाळून त्यांच्यात विश्‍वास निर्माण केला. खत एजन्सीकडूनही कंपनींकडून खते मागवण्यासाठी पुरेसे खेळते भांडवल उपलब्ध झाल्यामुळे जिल्ह्यात खत टंचाईवर मात करता आली. शेतकऱ्यांना बांधावर खतांसाठीही चांगला प्रयत्न झाला.

- बसवराज मास्तोळी, अधिक्षक कृषी अधिकारी 

संपादन - युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relief in fertilizer supply in the Sangali district; 35 thousand tons of fertilizer is still balance