लॉकडाऊनमध्ये उत्पादकांना दिलासा; इतके टन द्राक्ष, डाळींबाची निर्यात

Relief to producers in lockdown; Exported grapes, pomegranates
Relief to producers in lockdown; Exported grapes, pomegranates

सांगली : लॉकडाऊन काळात आटपाडी निर्यात सुविधा केंद्रातून पहिल्यांदाच द्राक्ष 200 टन व डाळींबाची 50 टन निर्यात झाल्यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला. यामुळे स्थानिक बाजारभाव वाढण्यास मदत झाली आहे. अशी माहिती पणन विभागाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी दिली. 

त्यांनी सांगितले की, कृषि पणन मंडळाने सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि उत्पन्न बाजार समिती, आटपाडी येथे उभारलेल्या निर्यात सुविधा केंद्रातून प्रांजली प्रशांत नारकर, मे सदगुरु एंटरप्रायजेस ठाणे यांच्या माध्यमातून द्राक्ष व डाळिंब निर्यात सुरु करण्याबाबत प्रयत्न करण्यात आले.

लॉकडाऊन कालावधीत निर्यात सुविधा केंद्र, आटपाडी येथून तासगांव, कवठेमहांकाळ, पलुस, सांगोला, आटपाडी, दिघंची व पंढरपुर या परिसरातील द्राक्ष व डाळींब उत्पादकांची 200 मेट्रिक टन द्राक्ष मलेशिया, दुबई, बांग्लादेश या देशात व 50 मेट्रिक टन डाळिंब दुबई येथे निर्यात करण्यात आली. निर्यातीमुळे द्राक्ष उत्पादकांना सरासरी दर 40 ते 50 रूपये प्रति किलो तर डाळिंब उत्पादकांना 60 ते 70 रुपये प्रति किलो दर मिळाला. 

स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून पणन संचालक सुनिल पवार, सरव्यवस्थापक दीपक शिंदे, उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड यांच्या प्रयत्नाने प्राजंली नारकर यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातून आटपाडी निर्यात सुविधा केंद्रातून पहिल्यांदाच द्राक्ष, डाळींबाची निर्यात झाली. जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा अतिवृष्टीमुळे महापुराचा तडाखा बसला होता. त्यामधुन सावरुन शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करुन द्राक्ष, डाळिंबाचे चांगले उत्पादन घेतलेले होते.

हंगामाच्या जगभरात कोरोना विषाणूने हातपाय पसरण्यास सुरुवात केली. कोरोना विषाणुमुळे संपुर्ण देशभर लॉकडाऊन केल्यामुळे ऐन हंगामात स्थानिक बाजार पेठात द्राक्षाचे दर 15 ते 20 रुपये प्रति किलो व डाळिंबाचे दर 25 ते 30 रुपये प्रति किलो पर्यंत खाली आलेले होते. तसेच वाहतुक निर्बंध व मजुर स्थलातंरामुळे निर्यातीवरती सुध्दा मर्यादा आलेल्या होत्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com