स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा

राजशेखर चौधरी
सोमवार, 19 मार्च 2018

अभिषेकाची पावती करणाऱ्या स्वामी भक्तांना श्रीफळ, खडीसाखर प्रसाद देण्यात आले. सकाळी 10 ते 12 या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानचे विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने भजन होऊन गुलाल पुष्प वाहण्यात आले, त्यानंतर पाळणा कार्यक्रम संपन्न झाला.

अक्कलकोट - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्तिथीत मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रद्धेने पार पडला. पहाटे 5 वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्तिथीत करण्यात आली. त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होणेकरिता स्वामी भक्तांच्या वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्यात आले होते.

अभिषेकाची पावती करणाऱ्या स्वामी भक्तांना श्रीफळ, खडीसाखर प्रसाद देण्यात आले. सकाळी 10 ते 12 या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानचे विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने भजन होऊन गुलाल पुष्प वाहण्यात आले, त्यानंतर पाळणा कार्यक्रम संपन्न झाला. भजनगीत व आरती होऊन स्वामींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुपारी 12 ते 3 या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्त निवास भोजनकक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन प्रसाद देण्यात आले. दुपारी 4 ते 6 या वेळेत देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात पंचम निर्मित चिंचवड पुणे येथील मिलिंद पोतदार व सहकारी यांचा सुमधुर भावभक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले.  

सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी, सेवेकरी प्रयत्नशील होते. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त विलासराव फुटाणे, महेश गोगी, श्रीनिवास इंगळे, प्रदीप हिंडोळे, बाळासाहेब घाटगे, अक्षय सरदेशमुख, श्रीपाद सरदेशमुख, प्रा.शिवशरण अचलेर, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, स्वामीनाथ लोणारी, संजय पवार, अमर पाटील, महादेव तेली, संजय पाठक, सागर गोंडाळ, गिरीश पवार, दीपक जरीपटके, रामचंद्र समाणे, आदींसह असंख्य स्वामीभक्त उपस्थित होते. 

Web Title: religious swami samartha program akkalkot