घराणेशाही मोडून काढा - राजू शेट्टी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

पुनाळ - वर्षानुवर्षे पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्याला डावलून केवळ जिल्हा परिषद आरक्षण खुले झाल्याने नेत्यांचे पुत्रप्रेम उफाळून आले आहे. या घराणेशाहीच्या प्रवृत्तीला ठेचून काढण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे जागृत मतदारांनो घराणेशाहीला मोडून काढा, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले. तिरपण (ता. पन्हाळा) येथे वाघवे पंचायत समितीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विक्रम आनंदा पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरदार बोळावे होते. 

खासदार शेट्टी म्हणाले, ""खोटी आश्‍वासने देऊन मते मागायची व निवडून आल्यानंतर स्वार्थासाठी कार्यकर्त्यांनाच दावणीला देण्याची पद्धत रूढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून घराणेशाही फोफावली आहे. या घराणेशाहीमुळे पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांचा बळी जात आहे. हेच लक्षात ठेवून आम्ही चळवळीतल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मतदारांनी या चळवळीला लोकचळवळ म्हणून साथ द्यावी.'' 

वाघवे पंचायत समितीचे उमेदवार विक्रम पाटील (तिरपण) म्हणाले, ""मतदारसंघात कोणत्या विशिष्ट लोकांचीच मक्तेदारी नाही. त्यामुळे लोकांच्या मनातील उमेदवार कोठेच न दिसता नेत्यांची मुलेच उमेदवार आहेत. मग कट्टर कार्यकर्त्याने काय पाठीमागेच राहायचे काय? तळागाळातील कार्यकर्त्याला पुढे आणण्यासाठीची हीच वेळ आहे.'' 

तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी स्वागत केले. या वेळी रामराव चेचर, रवी पाटील, सरदार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सभेला भगवान बोळावे, भगवान पाटील, एन. डी. पाटील, राघू चौगले, संजय चौगले, संजय रसाळ, मोहन पाटील, सर्जेराव पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते. सुरेश पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Remove the royal family - shetty