संजय घाटगे यांची घराणेशाही मोडून काढा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

कागल - गेली अनेक वर्षे संजय घाटगे यांच्या घरातच पंचायत समितीसह अन्य पदे आहेत. त्यांनी कधीच कार्यकर्त्यांची कदर केली नाही. सत्तेत आपण व आपल्या घरातीलच हा त्यांचा अजेंडा असून त्यांनी मुलाला उमेदवारी दिली नसती तर जिल्हा परिषद बंद पडली असती काय, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला. 

म्हाकवे (ता. कागल) येथे राष्ट्रवादीच्या उमेदवार वृषाली रवींद्र पाटील व पंचायत समितीच्या उमेदवार अनिता रमेश पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. 

श्री. मुश्रीफ म्हणाले, ""पंचायत समितीचा कारभार अत्यंत वाईट पद्धतीने करून मिळणाऱ्या सर्व योजना विरोधकांनी लाटल्या आहेत. आम्ही मात्र 20 वर्षांत विकासकामांच्या माध्यमातून तालुक्‍याचा कायापालट केला. आम्ही केलेली कामे सांगण्यास वेळ अपुरा पडेल. विरोधकांकडे मात्र सांगण्यासारखे एकही काम नाही. 

शाश्‍वत विकास, नकारात्मक राजकारण याचे कोडे मला उलगडले नाही. आम्ही नेहमी सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून समाजाच्या आणि तालुक्‍याच्या विकासासाठी काम केले. आमच्या उमेदवारांचा विरोधकांनी धसका घेतला आहे. म्हणूनच त्यांच्यावर तक्रारी केल्या जात आहेत.'' 

ते म्हणाले, ""समरजितसिंह घाटगे यांच्या लाल दिव्याची मला काळजी आहे. सरकार कधी कोसळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे समरजितसिंह घाटगे यांना म्हाडाचे अध्यक्षपद कधी मिळेल हे सांगता येत नाही.'' 

या वेळी राजू लाटकर, राजाराम पाटील, उमेदवार वृषाली पाटील, अनिता पाटील, सागर कोळी, धनंजय पाटील, सीताराम गोरे, सुभाष चौगुले, भैय्या माने यांची भाषणे झाली. या वेळी सरपंच भारत लोहार, सिद्राम पाटील, जीवन कांबळे, मारुती उर्फ रमेश पाटील, हिंदूराव पाटील, शहाजी पाटील, एस. के. पाटील, शेखर सावंत, संजय कदम उपस्थित होते. डी. एस. पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Remove the royal house of Sanjay ghatage