शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारील शिल्पे हटवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

तासगाव - येथील गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिक शाळेकडे नगरपालिकेकडून हस्तांतरित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी ठेवलेली दादोजी कोंडदेव व संत रामदास यांची शिल्पे तीन दिवसांत हटवा अन्यथा संभाजी ब्रिगेड हटवेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांनी दिला. 

संभाजी ब्रिग्रेडने नगरपालिका, शाळेविरोधात पोिलसांत फिर्यादही दिली.  शहरात छ. शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यासाठी जुना पुतळा काढून सांगली शिक्षण संस्थेकडे हस्तांतरीत केला आहे. पुतळा बसवल्यानंतर तेथे दादोजी कोंडदेव व संत रामदास यांची भित्तीशिल्पे  लावण्यात आलीत. त्यास औंधकर यांनी हरकत घेतली आहे. १९ जुलैपर्यंत ती शिल्पे हटवा, तसेच पुतळ्याची प्रतिष्ठापना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
Web Title: remove the sculptures surrounding Shivaji Maharaj's statue