महिलेच्या पोटातून काढला सव्वातीन किलोचा मांसाचा गोळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

राहाता - गेल्या तीन वर्षांपासून पोटदुखीच्या आजाराने उषा आनंद गडगे (वय ४२) या त्रस्त होत्या. त्यांच्या पोटातील सव्वातीन किलो वजनाचा मांसाचा गोळा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संतोष मैड यांनी शस्त्रक्रिया करून बाहेर काढला. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी ही शस्त्रक्रिया अल्पदरात केली. 

लोकरुची प्रतिष्ठानाच्या माध्यमातून विविध सेवाभावी उपक्रम राबविले जातात. यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन गरजू रुग्णांवर अल्पदरात उपचार केले जावेत, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी लोकरुची प्रतिष्ठानाच्या कार्यक्रमात व्यक्त केली होती. त्यास प्रतिसाद देऊन ही शस्त्रक्रिया अल्पदरात करण्यात आली. शस्त्रक्रिया केलेल्या महिलेची तब्येत उत्तम असल्याची माहिती डॉ. मैड यांनी दिली.

Web Title: Removed the woman's womb 3.25 kg caruncle

टॅग्स