मिरजेतील ऐतिहासिक मार्कंडेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार...जगद्‌गुरू सूर्याचार्य कृष्णदेवनंद महाराज

krishnadevnand maharaj.jpg
krishnadevnand maharaj.jpg

सांगली-  मिरजेतील कृष्णा घाटावरील ऐतिहासिक मार्कंडेश्‍वर मंदिरात भगवान श्रीरामांनी शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली होती. या मंदिराचा जीर्णोद्धार अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर सर्वजण एकत्र येऊन करणार आहेत. त्यानिमित्त एक ते आठ नोव्हेंबरअखेर मिरजेत महाकुंभ मेळावा होईल अशी माहिती द्वारका येथील जुना आखाड्याचे जगद्‌गुरू सूर्याचार्य कृष्णदेवनंद गिरीजी महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, ""मिरजेतील कृष्णा घाटावरील मार्कंडेश्‍वर मंदिरात भगवान श्रीरामाच्या हातांनी शिवलिंगाची प्रतिष्ठापना झाली होती. या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची वेळ आली आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी ज्याप्रमाणे सर्वजण एकत्र आलेत, त्याच धर्तीवर मार्कंडेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार आहे. लॉकडाउन 18 ऑक्‍टोबरपर्यंत शिथील होईल असा ठाम विश्‍वास वाटतो. त्यानंतर एक ते आठ नोव्हेंबरअखेर मिरजेत महाकुंभ मेळावाच होईल. त्यासाठी देश-विदेशातील साधु-संतांना आमंत्रित केले जातील. यावेळी देशातील जवानांसाठी पाच हजार रक्तबाटल्यांचे संकलन होईल. ते देशपातळीवरील नेत्यांकडे समर्पित केले जाईल. कार्यक्रमात पाच हजार पती-पत्नी श्रीमद भागवत पारायण वाचन सकाळी तीन तास करतील. दुपारी तीन ते सहा वेळेत साधुसंतांचे प्रत्येकी पाच मिनिटांचे आशीर्वचन होईल. तसेच शिवप्रतिष्ठानतर्फे संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती मंदिर ते मिरज घाटापर्यंत पाच हजारजणांची रॅली निघेल.'' 

ते पुढे म्हणाले, ""दिल्लीतील जामा मशिदमध्ये नमाज पठण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक लाख जणांना परवानगी दिली. त्याचप्रमाणे आम्हाला देखील या सोहळ्याला परवानगी दिली जाईल. महाकुंभ मेळाव्यासाठी एक हजार जणांना आमंत्रित करण्याचा प्रयास आहे. आठ दिवस आगळेवेगळे कार्यक्रम होतील. भविष्यात कृष्णाघाटावर मार्कंडेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याबरोबरच तेथे पर्यटनस्थळ विकसित केले जाईल. शिर्डी संस्थानप्रमाणे भक्तनिवास बांधण्याचा मानस आहे. बोटिंग, बगीचा आदी सुविधा निर्माण केल्या जातील. गोपाळराजे पटवर्धन हे परिसरातील अडीच एकर जागा देणार आहेत. मंदिर जीर्णोद्धारासाठी ट्रस्ट स्थापन केला जाईल.'' 
संभाजीराव भिडे, मनोहर सारडा, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, शिवप्रतिष्ठानचे हणमंतराव पवार, श्रीकांत शिंदे, मंदिराचे राजन महाराज आदी यावेळी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com