निवडणूकी आधी रस्ता दुरूस्त करा, अन्यथा मुलांना शाळेत पाठवणार नाही

प्रशांत माळी
रविवार, 17 जून 2018

आंधळगाव : लक्ष्मी दहिवडी येथून  मंगळवेढा ते  सांगोला रस्त्याला जोडणारा सहा किमी लांबीचा रस्ता मंजूर होऊन दहा वर्षे झाले तरी रस्ता ना दुरूस्त अवस्थेत असून यामुळे वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूकी आधी रस्ता दुरूस्त करा, अन्यथा मुलांना शाळेत पाठवणार नाही असा इशारा देत (ता.18) सोमवारी संध्याकाळी 10 वाजता लक्ष्मी दहिवडी फाटा मंगळवेढा सांगोला  रोडवर चाळीस धोंडा येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.   

या रस्त्यासाठी कांबळे वस्ती, शेजाळवस्ती, सोनवले वस्ती, जालगिरे वस्ती, होनमाने वस्ती, जाधव वस्ती, बंदवडे वस्ती, पाटील वस्ती, लिगाडे वस्ती, श्रीराम वस्ती, मेतकूटॆ वस्ती येथील शंभर नागरिकांच्या सह्यांचे निवेदन आमदार भारत भालके कार्यालय, आमदार प्रशांत परिचारक, अध्यक्ष समाधान आवताडे, जिल्हाधिकारी प्रांताधिकारी, पोलिस स्टेशन यांना प्रती देण्यात आल्या आहेत.

जत वरून पंढरपूर जाण्यासाठी जवळचा मार्ग असून पाया जाणाऱ्या वारकऱ्य़ांची संख्या देखील वारी कालावधीत जास्त असते या रस्त्याकडे  बांधकाम खात्यातील अधिका-यांनी पुर्णतः दुर्लक्ष केले असून रस्ता निवडणूकी आधी दुरूस्त करावा.  संपूर्ण रस्त्यावर खड्डे पडले असून रोज सकाळी शाळेत जाणां-या विद्यार्थ्यांना व दुधं घेऊन येणाऱ्या-जाणाऱ्या शेतक-यांना जीव मुठीत घेउन प्रवास करावा लागतो आहे.

रस्ता मंजूर होऊन गेली दहा वर्षे उलटली तरी रस्ता अजून खड्डेमय अवस्थेत आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत आदी पंचवार्षिक निवडणूकीत आजपर्यंत आश्वासने देण्यात आली. आता तीन महिन्यावर लक्ष्मी-दहिवडी पंचवार्षिक निवडणूक आली असून निवडणूकीच्या तोंडावर या रस्त्याचा प्रश्न गाजणार असल्याची दाट शक्यता आहे. या आदोलनाची दखल न घेतल्यास ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात येणार आहे.

Web Title: Repair the road before election\, otherwise the kids will not send them to school